महाराष्ट्र वेदभुमी

कोकण रेल्वे प्रवासी संघटना,रायगडच्या वतीने विशेष सभेचे आयोजन



सिकंदर आंबोणकर (गोरेगाव प्रतिनिधी) : दि.०७/०८/२०२४, कोकण रेल्वेच्या मार्गावर माणगाव स्थानक हे माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन ह्या तालुक्यांतील कोकण रेल्वे प्रवाशांना मध्यवर्ती स्थानक आहे...तसेच महाड, पोलादपूर, म्हसळा ह्या तालुक्यांतील कोकण रेल्वे प्रवाशांना वीर हे मध्यवर्ती स्थानक आहे...आणी माणगाव व वीर दोन्ही स्थानके मुंबई -गोवा महामार्गालगत  आहेत...त्यामुळे चाकरमानी, नोकरदार वर्ग, पनवेल, नवी मुंबई, मुंबई शहरात प्रवासी हे दैनंदिन प्रवास करत असतात...पण कोकण रेल्वे कडून दैनंदिनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कुठल्याही रेल्वे गाडीची व्यवस्था कित्येक वर्षे होत नाही....

    वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोकण रेल्वे प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही...त्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून पनवेल -माणगाव-वीर अशी विशेष लोकल, मेमू तातडीने सुरू व्हावी व ईतर प्रमुख रेल्वे गाड्यांना 'माणगाव व वीर'या रेल्वे स्थानकांवर थांबा मिळावा या मागणीसाठी 'जन आंदोलन'उभे करण्यासाठी तसेच विचार विनिमय करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन कोकण  रेल्वे प्रवासी संघटना,रायगड यांच्या वतीने गुरुवार दि.०८/०८/२०२४ रोजी सायं.ठिक ६:०० वाजता सेवा,भारती हॉल,१ला माजला,भाऊ दाजी रोड,फुल गल्ली, माटुंगा, मुंबई येथे आयोजित केली आहे...त्यासाठी रायगडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post