महाराष्ट्र वेदभुमी

शांतता व सलोखा टिकण्यासाठी शांतता कमेटी व जनतेचे सहकार्य महत्वाचे:-सपोनि नितीन मोहिते


पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर)

       कोलाड पोलिस ठाण्यात शांतता कमेटीची सभा आयोजित कारण्यात आली...यावेळी मार्गदर्शन करतांना कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी सांगितले कि माझ्याकडून कोलाड मधील रस्त्यासाठी पुरेपूर पाठपुरावा केला जाईल,तसेच आपल्या हद्दीत जे परप्रांतीय आलेत त्यांच्या मालकांनी त्यांची पूर्णपणे माहिती घेऊन त्यांचे आधारकार्ड,पॅनकार्ड,पासबुक घेऊन अग्रीमेंट करून घ्या त्यांनी काही अनुचित प्रकार केला तर त्यांना पकडणे सोपे जाईल,गणपती सणासाठी वाहतुकीस अडथळा येऊ नये यासाठी व्यापारी वर्गानी येणारा माल रात्रीच्या वेळी उतरून घ्यावे, प्रत्येक सोसायटी मध्ये सी.सी टीव्ही कॅमेरा लावा.मी तुमच्या साठी तत्पर असेल परंतु  समाजात शांतता व सलोखा  टिकून राहण्यासाठी शांतता कमेटी व जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे...

           गुरुवार दि. ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.०० वा. कोलाड पोलिस ठाण्यात येणारे सण व गणपती उत्सव यासाठी शांतता कमेटीची सभा कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आली... सभेच्या सुरवातीला पोलीस अंमलदार नरेश पाटील यांनी उपस्थित शांतता कमेटीचे स्वागत केले...          

              यावेळी संदीप बाईत,अजय लोटणकर,सुशील ढवळे,विजय शिंदे,विराज शिंदे,स्वप्नील महाबळे,कल्पेश पिंपळकर,प्रफूल्ल बेटकर,गणेश वाचकवडे,मनोज सावरकर,गणेश महाडिक,कुमार लोखंडे,शौकत हाफीज,भरत सतांबेकर,संदेश लोखंडे,फाईक हाफीज,विजय सानप,किरण खंडागळे,दयाराम पवार,गुलाब वाघमारे,संतोष जाधव,पोलिस शिद,तसेच शांतता कमेटीचे असंख्य सदस्य उपस्थित होते...

      शांतता कमेटीच्या सदस्य यांनी  कोलाड बाजारपेठेतील गटारावरील झाकण बसवणे,गणपती उत्सवाच्या काळात पार्किंगची सोय करून देणे, सरकारी दवाखान्यात संध्याकाळी डॉक्टर उपलब्ध असणे, कोलाड हायस्कूल रोड वर शाळा भरताना व शाळा सुटल्यावर पोलीस बंदोबस्त असणे अशा महत्वाच्या विषयावर चर्चा केली शेवटी पोलीस अंमलदार नरेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post