महाराष्ट्र वेदभुमी

महसुल सप्ताह नव्हे तर महसुल पंधरवडा साजरा होणार


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- महसुल विभागाकडुन दरवर्षी महसुल दिन व महसुल सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षीपासून महसूल सप्ताह ऐवजी 'महसूल पंधरवडा' तसेच 'पशुसंवर्धन पंधरवडा' साजरा होत आहे. या कालावधीत शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवा.शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची चांगली अंमलबजावणी करून शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी,

 दिनांक १ ऑगष्ट  ते १५ ऑगष्ट या कालावधीत महसुल पंधरवडा साजरा करण्याबाबत निर्देश आहेत. त्या अनुषंगाने ८ ऑगष्ट  रोजी तहसिल कार्यालय रामटेक येथे "महसुल जन संवाद" तहसिल कार्यालय रामटेक येथे महसुल अदालत व फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले. सदर फेरफार अदालत मधे प्रलंबित फेरफार निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच प्रलंबित महसुल प्रकणे, सलोखा योजना अंतर्गत प्रलंबित प्रकरणे, वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रुपांतरण करण्याची प्रकरणे निकाली काढण्यात आली. ..

तसेच  दिनांक ९ ऑगष्ट २०२४ रोजी “ महसुल ई प्रणाली “ कार्यक्रमा अंतर्गत तहसिल कार्यालय रामटेक येथे ई पंचनामे  करण्याबाबत सर्व तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आले.  तसेच ई- चावडी- अचुक जमीन महसुल मागणी निश्चित करणे व ऑनलाईन जमीन महसुल भरणे इत्यादीबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने सर्व तलाठयांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी मा रमेश कोळपे, तहसिलदार रामटेक यांनी ई- पंचनामे अचुक पध्दतीने करण्याबाबत सविस्तर व ई- चावडी अंतर्गत जमीन महसुलाची मागणी निश्चिती करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अंतर्गत नावामध्ये हस्तदोष/ तांत्रीक दोष बाबत कार्यवाहीच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली. ई- फेरफार बाबत प्राप्त तक्रारी विहित मुदतीत निकाली काढणे, ई- हक्क प्रणाली, महसुल विभागाच्या उपलब्ध ऑनलाईन सुविधा इत्यादीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. आपले सरकार पोर्टल वर प्राप्त होणा-या तक्रारीचे निराकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमांत श्री. योगेश राऊत, तालुका कृषी अधिकारी रामटेक, श्री.भोजराज बडवाईक नायब तहसिलदार रामटेक, श्रीमती सारीका धा्त्रक नायब तहसिलदार रामटेक, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक उपस्थित होते...

शासनाच्या योजना लोकांपर्यत पोहचवा

कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंपदा, सहकार यासह अन्य सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करावे. अधिकाऱ्यांनी  अधिक गतीमान, परस्पर समन्वय साधून नागरिकांची कामे वेळेत करण्यासोबत शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून लोकाभिमूख काम करावे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी लोकांपर्यंत जावे,

Post a Comment

Previous Post Next Post