महाराष्ट्र वेदभुमी

पिपरिया पेठ येथुन रोप-वे रद्द करा

 


नारायण टेकडी (अंबाळा) जवळ रोपवे बांधा : माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक : पिपरीया पेठ येथून गडमंदीरसाठी प्रस्तिवित रोप-वे मंजुर झाल्यामुळे वाद उफाळला आहे. रामटेकच्या गडमंदिरासाठी राष्ट्रीय महामार्गांतर्गत पीवरीया पेठेतून रोपवेसाठी नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंटकडून ७२ कोटी मंजूर झाले असून निविदा काढण्यात आली आहे...मात्र योग्य जागा न निवडल्याने लोकांचा विरोध होत आहे...

पिपरिया पेठेऐवजी नारायण टेकडी (अंबाला) जवळ रोपवे बांधण्याची मागणी माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे... ते म्हणाले की, नारायण टेकडी आणि अंबाला ही सर्व लोकांसाठी सोयीची ठिकाणे आहेत... ते म्हणाले की, याआधी रामटेक विकास आराखड्यात नारायण टेकडीजवळ रोप-वे एकमताने सुचवण्यात आला होता... हा रोपवे मंदिरासमोरन असेल. पिपरिया पेठेतून बनवल्यास मागच्या बाजूने होईल. ते म्हणाले की, ते मागील बाजूने प्रतावित केल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे...यामुळे मंदिराचे नुकसान होऊ शकते, असे लोकांचे म्हणणे आहे..

   पुरातत्व विभाग आणि वन विभागाकडून एनओसी प्रमाणपत्र घेतल्यानंतर आणि योग्य जागा निवडल्यानंतरच कामाच्या निविदा काढन्यात याव्यात. पत्र परीषद मध्ये यावेळी डॉ. राजेश ठाकरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष राहुल किरपाण, रामटेक शहर अध्यक्ष उमेश पटले, योगेश मात्रे, बैजू खरे, धर्मेंद्र शुक्ला, सागर गावंडे, शुभम बिसमोगरे नंदकिशोर कोहले, करीम मालाधारी, नंदू पापडकर, रामा अडामे उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post