महाराष्ट्र वेदभुमी

दीडशे कामगारांचे प्राण वाचले

 नगरसेवक अतुल ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक 


बोरी-उरण (अजय शिवकर ):  समाजामध्ये काही लोकं कित्येक मोठी झाली मात्र त्यांची नाळ सर्वसामान्य माणसांशी जोडलेली असते.. अडचणी व समस्यांना ते ताबडतोब धावून जातात.. त्यापैकी शिवसेनेचे नगरसेवक राजकीय नेता परंतु एक सामाजिक कार्यकरता म्हणून उरण मद्ये जास्त ओळख असनारे श्री अतुल ठाकूर..

गुरुवार २९ ऑगस्टला रात्री दहा वाजता सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्याशी चर्चा करताना अतुल ठाकूर यांना उरण बोरी वरून नंदू पवार यांनी फोन करून दत्ता पूरो यांच्या घराच्या मागे सिलेंडरचा स्फोट झाल्याचे कळवले.

क्षणाचाही विलंब न करता ठाकूर यांनी पवार यांच्याद्वारे सिडको फायर ब्रिगडला कळवून ते घटनास्थळी पोहोचले. 

बोरी गावात घारापुरीचे राजा पडते यांचे दिडशे कामगार राहत असलेल्या लक्ष्मी भवन येथे दुसऱ्या माळ्यावर गॅस सिलेंडर जळत असताना बोरी गावातील ग्रामस्थ विनोद चौगुले, नंदन पानसरे, वंदना पवार , दत्ता पुरो, विनेश पुरो आणि अमित गावंड उपस्थित होते.

फायर ब्रिगेडची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अधिकारी श्री कांबळे त्यांची संपूर्ण टिम व ठाकूर यांनी  लिकेज सिलेंडरला लागलेली आग विझविण्यास यश मिळवले..

 कांबळे यांनी सांगितले की  अतुल ठाकूर यांची तत्परता आणि प्रयत्न मुले मोठी दुर्घटना टळली असून कित्येकांचे प्राण वाचले.

गोरगरीब कामगार व बोरी गावातील नागरिकांनी नगरसेवक अतूल ठाकूर व सिडको फायर ब्रिगेडच्या टिमचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post