शाळेचा शिक्षकांनी राबविली वर्षभर विविध उपक्रमे
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था , खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे , विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे , शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणे , आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करणे व विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक सहाय्यता साक्षरता निर्माण करण्यासाठी शाळांना प्रेरित करण्यासाठी संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ राबविण्यात येत आहे... त्याच अनुषंगाने शहरातील समर्थ प्राथमिक शाळेत सुद्धा वर्षभरापासून शाळा सजावट, विविध प्रकारचे वृक्ष लागवड तथा इतर प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे...
शाळेला भेट दिली असता येथील मुख्याध्यापक गुंढरे मॅडम तथा उपक्रमशील शिक्षक रवींद्र मथुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अभियानाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शाळेत वर्षभरात शाळा सजावट, विविध वृक्ष लागवड त्याची जाेपासना, शाळा ईमारत व संरक्षण भिंत रंगरंगाेटी, डिजिटल वर्गखाेल्या , मेरी माटी मेरा देश उपक्रम, परसबाग निर्मिती, नवसाक्षरता कार्यक्रम, स्वच्छता माँनिटर, महावाचन चळवळ, विविध स्पर्धा, आराेग्य तपासणी, आजार तज्ञांचे मार्गदर्शन, हात धुणे उपक्रम, प्लास्टिक मुक्त शाळा, विविध संस्था व पालक यांचे शाळा विकासाकरीता याेगदान इत्यादी उपक्रम गेल्या वर्षभरापासून राबविले जात आहेत...
अशा विविध स्पर्धा व उपक्रमांतून मुलांचा भरघोस असा विकास होईल यात दुमत नाही. ..राज्यात टप्पा २ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येत असून मोठ्या रकमेचे पुरस्कार सुद्धा ठेवण्यात आले आहे... मोठी रक्कम शाळांना मिळणार असल्याने जवळपास सर्वच शाळा आपल्या शाळेचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्नशिल आहे... जिल्हा परिषदेच्या शाळांनीही या अभियानात स्वयंस्फूर्त सहभाग घेतलेला असून त्यामुळे शाळा विकासात या अभियानाचे मोलाचे योगदान राहणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे...
नव्या उपक्रमांचा समावेश
पहिल्या टप्प्यांतील अभियानाच्या यशस्वीतेमुळे यंदा २०२४-२५ मध्येही "मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा टप्पा २'' हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे...
अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधांसाठी ३३ गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी ७४ गुण व शैक्षणिक संपादनांसाठी साठी ४३ गुण, असे एकूण १५० गुण देण्यात येणार आहेत...