ग्रुप ग्रामपंचायत खैरेखुर्द,ता.रोहाच्या वतीने हार्दिक अभिनंदन..!
विशेष प्रतिनिधी-: रोहा रायगड : ग्रुप ग्रामपंचायत खैरेखुर्द,ता.रोहाच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्री शहानवाज युनुस मुकादम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले..
शहानवाज मुकादम हे नेहमीच माहिती अधिकार कार्यकर्ता, पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आणि गोरगरीबास न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असुन संबंधित प्रशासन व पोलीस विभागातील त्याचे सलोख्याचे संबंध याचा लाभ निश्चितच नागरिकांना होइल अशी आशा आहे...
प्रसंगी अब्दुल हमीद अहमद गीते, गोपीनाथ देवळे, इफतीखार धनसे, सरपंच मुजम्मील गीते, उपसरपंच जुबैर धनसे, बशीर धनसे, रफीक बडे, पांडुरंग कोंडे, रिजवान खोत, मुबीन बडे, नथुराम बिरवाडकर, मुख्तार धनसे, कमाल धनसे, लक्ष्मण बांदल, खैरेखुर्दचे पोलीस पाटील अ.रउफ पित्तु आदींनी ही शुभेच्छा दिल्या...