महाराष्ट्र वेदभुमी

शास्त्रीय सल्लागार समितीची सभा,सदस्यांचा सत्कार समारंभ


पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर ) : भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्ली व डॉ. बाळासाहेब सावंत कृषि विद्यापीठ दापोली यांची  शास्त्रीय सल्लागार समितीची सभा दापोली येथे नुकतीच संपन्न झाली...

               यावेळी डॉ.संजय भावे कुलगुरू,डॉ.पराग हळदणकर विस्तार शिक्षण संचालक, डॉ.एस.के.रॉय संचालक आटारी पुणे, डॉ. शाकीर अली प्रमुख शास्त्रज्ञ पुणे, डॉ. सतिश नारखेडे डायरेक्टर, श्री. कुलकर्णी लीड बँक रायगड, महेश केलकर नाबार्ड अलिबाग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सभा आयोजित करण्यात आली...   

 तसेच यावेळी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यातील शास्त्रीय सल्लागार समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.. यामध्ये रायगड मधून शरद गोळे (सुधागड) श्रीधर जंजिरकर( मुरुड), बाळाराम दळवी (माणगाव),रुपाली देवकर (रोहा) यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला...


    प्रत्येक जिल्ह्यातील शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य यांनी केले कार्याची माहिती करुन दिली यामध्ये सुधागड तालुक्यातील शरद गोळे यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग करून शेतीसह भुईमूग,हळद,यावर विशेष जागृती करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.शेती पूरक व्यवसायावर अधिक भर देऊन तालुक्यात  कृषिपर्यटन, शेतीपालन, कुळशेती, भाजीपाला लागवड,यामध्ये शेतकरी व महिला बचत गट तयार केले...शेती उत्पादनच्या विक्रीच्या बाबतीत जनजागृती काम सुरु आहे.सर्व सभा मोठया उत्सही वातावरणात संपन्न झाली...

Post a Comment

Previous Post Next Post