आपल्या गावासाठी जागणारा उमदा कार्यकर्ता -देवचंद्र म्हात्रे.
या व्यक्तीनं आपल्या गावच्या गावातील एखाद्या कार्यक्रमात जेवणाची अत्यंत गरज असते...मग ते बनवायचे तर चांगली भांडी असावी अशी महत्त्वाची गोष्ट गावच्या महिलांनी आपल्या कार्यकर्त्यासमोर मांडली... आणि दिलेल्या शब्दाला ओ देणारा माणूस म्हणून श्रीे. देवचंद्र म्हात्रे या व्यक्तीनं आपल्या स्थानिक आमदाराच्या कानी घातली... आणि महिलांची सुप्त मागणी त्या आमदाराकरवी पुर्ण करून दिली आणि माता भगिनींचे आशिर्वाद घेतले...
आजगायत गावातील अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रत्यक्ष थोडी-थोडकी का होईना उदार अंतकरणाने देणगी देणारा म्हणून एक कार्यकर्ता अशी ओळख मिळवणारा आपला माणूस...शेतकरी कुंटुंबात जन्माला आलो पण नाव करावं या हेतूने आपल्याा पत्नीला गावातील ग्रामस्थांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत निवडणूकीत उभी करून जिंकून ग्रुप ग्रामपंचायत शेडसई सदस्य होण्यासाठी मोलाची साथ देणारा जोडीदार अशी त्याची ख्याती आहे...गावाचा विकास हा वसा हाती घेऊन आज गावच्या मंदिराला कलर आणि सुशोभिकरणाचा काम आपल्या कार्यकर्त्याने श्री छोटमशेठ भोईर यांच्या माध्यमातून गावाच्या लोकांना मिळून दिला... याचे सारे श्रेय या व्यक्तीला जातं...गावासाठी नेहमी झटणारा एक योद्धा ,शेतकरी कुटुंबातील तरूण होतकरू कार्यकर्ता ,आणि रोहा तालुक्यात दांडगा जनसंपर्क असलेला कार्यकर्ता अशी ओळख मिळवणारा आपला माणूस श्री. देवचंद्र म्हात्रे ही व्यक्ती आहे...