वडील व मुलाला हत्येचा गुन्हात अटक
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- रामटेक पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या साटक गावात ४५ वर्षीय फोटोग्राफरला वडील व मुलाने बेदम मारहाण केली, यात जखमींचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, याप्रकरणी रामटेक पोलिसांनी आरोपी वडील व मुलाला अटक केली आहे...
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अनुसार, मृत्य अर्जुन वैद्य हा साटक गावातील रहिवासी असून त्याचा शेजारील चिरकुट चंदेले व संजय चंदेले यांच्याशी ६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास काही कारणावरून वाद-विवाद झाला, त्यात दोन्ही आरोपींनी मिळून मृताला बेदम मारहाण केली... त्यांच्या मदतीला मृताची पत्नी अश्विनी वैद्य आणि मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या ७ वर्षाच्या मुलालाही आरोपींनी मारहाण केली...
यात गंभीर जखमी झालेल्या मृत्य अर्जुन वैद्यला साटक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले... नंतर त्याला रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवले, तेथे डॉक्टरांनी जखमी अर्जुन वैद्यला नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असुन, उपचारा दरम्यान तेथे त्याचा १० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला... रामटेक पोलिसांनी संजय चंदेले आणि चिरकुट चंदेले या दोघाना वडील-मुलाला अटक केली असून, हत्यासह भारतीय न्याय संहिता विविध कलमसह १०९, ३५१(३), ३५२(३), १०३(१) गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे...
