रायगड जिल्हा ग्रामीण सहा आसनी मिनिडोअर संघटनेने जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एक वर्षांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एसटी प्रवासामध्ये महिलांना सरसकट ५० टक्के सवलत देऊन सवलतीचा ठराव पास केला...त्याचा परिणाम गेली २० वर्षे मिनिडोअर रिक्षा चालवणाऱ्या गोर गरीब रिक्षा चालकांवर झाला आहे... या योजने अंतर्गत एसटी महामंडळाला सरकार वर्षाला २५० कोटी रुपये देत असल्यामुळे रिक्षा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे... दिवसभर बाराबारा तास मेहनत करून ही रिक्षचालकांना ३०० रुपयेही मिळत नाहीत... यामुळे रिक्षा वाल्यांवर कर्जाचा बोजा वाढत आहे... अपुऱ्या पैशा अभावी रिक्षचालकांच्या मुलांना उच्च शिक्षणापासुन वंचित रहावे लागत आहे... रायगड जिल्ह्यातील रिक्षावाला आर्थिक व मानसिक तणावात आलेला असून याला जबाबदार सरकार आहे...असे म्हणत संघटनेचे अध्यक्ष प्रफूल्ल भगत, जयराम खाडे, डॅनी महाराज यांच्या नेतृत्वाखाली रोहा, वडखळ, माणगाव, नागोठणे, श्रीवर्धन,पोयनाड, खोपोली, अलिबाग, संघटने तर्फे रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देण्यात आले आहे...
प्रतिक्रिया :-
एसटी प्रवासात महिलांना सवलत दिल्यापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मिनिडोर रिक्षावाल्यांचा व्यवसाय मिळत नाही, दिवसभर मेहनत करून ३०० रुपयेही आता मिळत नाहीत...त्यामुळे रिक्षाचालक बांधवांवर कर्जाचा बोजा वाढत आहे...कर्जाचे हफ्ते थकले आहेत... त्यामुळे रिक्षचालकांनी कसे घर चालवायचे व कसे मुलांना शिक्षण द्यायचे असा प्रश्न आमच्यासमोर असल्याने मायबाप सरकारने आमचा विचार करावा यासाठी शासनाला आमच्या संघटनेतर्फे निवेदन दिले आहे.. - प्रफुल्ल भगत, अध्यक्ष रायगड जिल्हा ग्रामीण सहा आसनी मिनिडोअर संघटना
