पांदन रस्ते तयार करण्यात रामटेक विधानसभा राज्यात आघाडीवर
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- दळणवळण सुधारणा ही बाब शेती व ग्रामविकासातील सर्वात महत्त्वाची बाब आहे... आजही दुर्गम किंवा अनेक गावे रस्त्यांच्या मुख्य प्रवाहापासून बऱ्याच अंशी दूर आहेत...त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून पांदन रस्ते योजना राबवण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे... या अंतर्गत माती, दगड व मुरूम टाकून कच्चे शेतरस्ते किंवा पांदन रस्त्यांचे मजबुतीकरण,पांदन रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे आणि पांदन रस्ता अतिक्रमणमुक्तीतून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे बांधणे या तीन बाबींवर सरकारने भर दिला आहे...
ही कामे राबवण्यासाठी चौदावा वित्त आयोग, मनरेगा, खासदार, आमदार स्थानिक विकास निधी, वैधानिक विकास महामंडळांतर्गतचा निधी, गौण खनिज विकास निधी यातून निधी उपलब्ध करण्यात आला आहे... याचाच लाभ घेत रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांनी मतदारसंघात ६०० कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करून शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर केला आहे...
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे पांदण रस्ते त्वरीत पूर्ण करण्याच्या उद्देशाने आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांनी रामटेक, पारशिवणी व मौदा तालुक्यातील पांदण रस्ते डांबरीकरण करण्याकरिता पांदण रस्त्यांना मंजुरी देऊन निधीची तरतूद करून देण्याची मागणी ॲड.आशिष जयस्वाल यांनी सातत्याने लावून धरली होती... या मागणीची दखल घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, जिल्हा खनिज प्रतिष्ठान, मातोश्री ग्राम समृद्धी पांदण रस्ते योजने या सह अन्य योजनातून शासनाने मतदारसंघातील पांदण रस्त्यासाठी मान्यता व निधी उपलब्ध करून दिला त्यानुसार मतदारसंघातील ६०० किलो मिटर रस्त्याचे आता डांबरीकरण पूर्णत्वास गेले... आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांचा शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे... शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल काढण्याकरिता व शेतात जाण्याकरिता पांदण रस्त्याची दुरावस्था पाहून शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला... यांत्रिकीकरणामुळे शेतामध्ये पेरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात अशा यंत्र सामग्रीचा वाहतूक करण्याकरता पावसाळ्यातही शेत पांदण रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे ..
आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांनी रामटेक, पारशिवणी व मौदा तालुक्यातील पांदण रस्ते पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत...या दृष्टिकोनातून पांदन रस्ते योजना राबविण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे... त्या अनुषंगाने कामांचे नियोजन करण्यात आले आहे... नुकताच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -२ संशोधन व विकास अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली असून यासाठी ७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे... ज्यातून मतदारसंघांतील चोखाळा ते तरोडी, पारशिवनी ते निंबा, येसंबा ते कन्हान निलज बोरी, वाघोली ते वराडा ते टेकाडी, खेडी ते प्रजिमा-२१अ (निमखेडा), दुधाळा, तुमान ते खापरखेडा, तारसा ते आष्टी, चाचेर ते आष्टी,नगरधन ते बिजेवाडा या रस्त्यांची डांबरीकरण करण्यात येणार आहे...
“रामटेक, पारशिवणी व मौदा तालुक्यात बहुतांश पांदण रस्त्याची कामे मंजूर करून पूर्ण झाली आहे... तर उर्वरित रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहे अशी माहिती असे आमदार जयस्वाल यांनी दिली...रामटेक, पारशिवणी व मौदा हे तालुके धान उत्पादनासाठी प्रसिद्ध असून शेतातील धान काढण्याकरिता मोठे वाहन शेतात नेण्याकरिता अडचणींचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना वहिवाटीकरिता पांदण रस्त्यांची मोठी अडचण आहे... हीच अडचण लक्षात घेता रामटेक, पारशिवणी व मौदा तालुक्यातील पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी आमदार जयस्वाल यांनी प्रयत्न सुरू केला...
ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी मिळणारे अनुदान, महसुली अनुदान, पेसाअंतर्गत निधी व स्व-निधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सेस आणि इतर जिल्हा योजना अशा विविध योजनांमधून मिळणारा निधी खर्च करण्यासही सरकारने मान्यता दिली आहे...याचीच प्रभावी अंमलबजावणी करत रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांनी मतदारसंघातील ६०० किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरण करून राज्यांमध्ये पांदन रस्ते तयार करण्यात आघाडी घेतली आहे... यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे त्रास दूर होऊन त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर झाल्याचे पहावयास मिळत आहे...
मतदारसंघ पांदन रस्त्यातच नाहीं तर सर्व बाबीत राज्यात आघाडीवर असेल...
रामटेक विधानसभा मतदारसंघात हा पांदण रस्ते तयार करण्यात राज्यात आघाडीवर असून सद्यस्थितीत मतदारसंघातील ६०० किलोमीटर पांदण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे. तर अन्य विषयांना घेऊन सुद्धा की ज्यात घरकुल योजना, लाडकी बहीण योजना, बौद्ध विहार बांधणी, वाचनालय उभारणी, दवाखाना आपल्या दारी, मोफत नेत्र रोग तपासणी यासह अनेकांना विविध योजनांचा वैयक्तिक लाभ देऊन मतदारसंघ सर्व बाबींमध्ये राज्यात आघाडीवर आणण्याचा माझा प्रयत्न आहे...नुकत्याच झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात रामटेक विधानसभा मतदारसंघाला राज्य शासनाकडून भरीव निधी देण्यात आलेला आहे...त्या आधारे विकासाची असंख्य कामे प्रगतीपथावर आहेत.. -आमदार ॲड. आशिष जयस्वाल, (रामटेक विधानसभा मतदारसंघ)
