माजी आमदार रेड्डी यांनी नितीन गडकरी यांचे मानले आभार..
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचे नियोजन पूर्ण होत नाही तोच मेट्रो आता जिल्ह्यातील ग्रामीण भागालाही जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे... काटोल, वर्धा, रामटेक, भंडारा, सावनेर, पारशिवनी इथपर्यंत ही मेट्रो धावेल...हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी महामेट्रो आणि भारतीय रेल्वेत यांच्यात करार करण्यात येणार आहे...
मास रॅपीड ट्रान्झिट सिस्टीमअंतर्गत मेट्रोचे नेटवर्क तयार करण्यात येणार आहे...
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी आणि रामटेक तालुक्यात लवकरच १४० कि.मी वेगाने मेट्रो ट्रेन धावणार आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत...
एकीकडे रामटेकच्या ऐतिहासिक भूमीवर रोपवे बांधण्याच्या प्रक्रियेबाबत प्रशासकीय पातळीवर काम सुरू झाले आहे, तर दुसरीकडे १४० किलोमीटरची स्पीड मेट्रो ट्रेनही रामटेकमध्ये लवकरच दाखल होणार असून ज्याचे काम सुरू आहे आणि वर्षभरात सुरू होण्याची शक्यता आहे, कामठी, कन्हान, आमडी, मनसरसह रामटेक येथील नागरिकांना मेट्रो ट्रेनचा फायदा होणार असून, त्यात व्यापाऱ्यांपर्यंत माल पोहोचवण्यासाठी स्वतंत्र डबा बसवण्यात येणार आहे... या मेट्रो ट्रेनमध्ये एकूण ६ डबे आहेत...महामेट्रोवरील जबाबदारी वाढत असून नागपूर मेट्रो जिल्ह्यातील इतर भागांतही नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे... महामेट्रो आणि रेल्वे यांच्या सहकार्यातून मेट्रो रेल्वेचा पुढील विस्तार करण्यात येणार आहे... रेल्वेच्या ट्रॅकवर ही फिडर ट्रेन धावणार आहे... महामेट्रोकडून ही सेवा चालविण्यात येईल... यामुळे वाहतुकीला गती मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळेल...
पहिला प्रयोग नागपुरात
काटोल, वर्धा, रामटेक, भंडारा, सावनेर,पारशिवनीपर्यंत फिडर ट्रेन जोडण्यात आल्याने कमी वेळात या शहरात पोहोचता येणार आहे...विदर्भातील अर्थशास्त्राला यामुळे गती मिळेल. रेल्वेच्या मार्गावर मेट्रो धावणार असून या प्रयोगामुळे मेट्रोला प्रवासी मिळतील...
