महाराष्ट्र वेदभुमी

महामार्ग दुरुस्ती काम येत्या १५दिवसात वेगाने व दर्जेदार न केल्यास करणार रास्ता रोको आंदोलन-मनोज खांबे

रोहा (प्रतिनिधी): रायगड प्रेस असोसिएशन च्या कार्यकारिणीची सभा रोहा येथील बयोज फार्म हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती... या सभेत मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थे संदर्भात महामार्गावर रायगड प्रेस क्लबच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलना बाबत चर्चा करण्यात आली...

  यावेळी रायगड प्रेस क्लबच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाला आंदोलना बाबत दिलेल्या पत्राची दखल घेत दिलेल्या उत्तरात महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु केल्याने आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आली आहे... मात्र महामार्ग विभागाकडून सुरु असलेले दुरुस्तीचे काम हे अत्यंत संथ गतीने आणि नित्कृष्ट दर्जाचे असून ज्याठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली आहे...त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकून डागडुजी केली जात आहे...मात्र गतवर्षी केलेले पेव्हर ब्लॉकचे काम उखडले आहे... त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुरु केलेले काम दुरुस्तीचे काम येत्या १५ दिवसात वेगाने करून हे काम दर्जात्मक व्हावे अन्यथा रायगड प्रेस क्लबच्या वतीने आमचे नेते एस एम देशमुख यांचे नेतृत्वाखाली असंविधानिक रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी महामार्ग विभागाची राहील असा इशारा रायगड प्रेस क्लबच्या वतीने रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे सचिव अनिल मोरे यांनी दिला..

नागोठणे ते लोणेरे दरम्यानच्या रस्त्यावर पडलेले खड्डे, अपूर्ण अवस्थेत असलेले उड्डाणपूल आणि अपूर्ण अवस्थेत असलेले माणगाव आणि इंदापूरचे बायपास मार्ग हे पूर्ण करून मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत करा अन्यथा १७ ऑगस्ट रोजी सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन करणार असल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच संबंधित मंत्री मुख्यमंत्री खासदार आदींना देण्यात आले होते...या पत्राची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने रायगड प्रेस क्लबला पत्र पाठवले असून त्या पत्रामध्ये खड्डे भरण्याचे काम सुरू केले असल्याचे कळविले आहे...मात्र महामार्ग विभागाकडून सुरु असलेले दुरुस्तीचे काम हे अत्यंत संथ गतीने आणि नित्कृष्ट दर्जाचे असून ज्याठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकून डागडुजी केली जात आहे मात्र गतवर्षी केलेले पेव्हर ब्लॉकचे काम उखडले आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुरु केलेले काम दुरुस्तीचे काम येत्या १५ दिवसात वेगाने करून हे काम दर्जात्मक व्हावे अन्यथा रायगड प्रेस क्लबच्या वतीने आमचे नेते एस.एम.देशमुख यांचे नेतृत्वाखाली असंविधानिक रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी महामार्ग विभागाची राहील असा इशारा रायगड प्रेस क्लबच्या वतीने रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे सचिव अनिल मोरे यांनी दिला...

      या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर,कोकण विभागीय सचिव अनिल भोळे,रायगड प्रेस क्लबच्या कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे,उपाध्यक्ष मोहन जाधव,सचिव अनिल मोरे,खजिनदार दरवेश पालकर,माजी अध्यक्ष अभय आपटे,भारत रांजणकर, बी.एस. कुलकर्णी,राजेंद्र जाधव, शशिकांत मोरे, सुहास खरीवले अदी पदाधिकारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post