विशेष प्रतिनिधी नागपूर: कन्हान - मागील काही दिवसांपासून कान्हान पिंपरी शहरमध्ये घरफोडी, एटीएम फोडी आदीं चोऱ्या प्रकरणांची वाढ झाली असून त्या प्रकरणी कन्हान पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरिक्षक उमेश पाटील काम पाहत होते...
अशातच दिनांक १३ ऑगस्ट रोजी नागपुर ग्रामीण पोलिस हेडऑपिस मधून पोलिस निरिक्षक राजेन्द्र जगन्नाथ पाटील यांची कन्हान पोलिस स्टेशन मध्ये नियुक्ती करण्यात आली...
पोलिस निरीक्षक पाटील यांचे प्रशांत बाजीराव मसार यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तसेच पुढील काम पाहण्यासाठी विश्वासनीय शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले... यावेळी चंदन मेश्राम, दिपक तिवाडे, देवा चतुर, विनोद येलमुळे उपस्थित होते...
