पुगाव- खांब (नंदकुमार कळमकर) : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहा विभागीय खांब युवक मंडळाची सभा श्रीक्षेत्र नडवली येथील हनुमान मंदिरात मंगळवार दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता खांब कुणबी युवक मंडळाचे अध्यक्ष संतोष भोईर याच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न झाली असून सदरच्या सभेत नव्याने विभागीय कमिटीची नियुक्ती करण्यात आली असून शरद जाधव यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली प्रसंगी यावेळी खांब विभागातील बहुसंख्येने युवक समाज बांधव उपस्थित होते...
सभेच्या सुरुवातीला देशपातळीरील शहीद झालेले जवान तसेच विभागातील कै.जेष्ठ नेते रामचंद्र पोटफोडे तसेच १६ गावात मृत्यू झालेले समाज बांधवांना श्रद्धांजली वाहिली...सचिव संतोष चितळकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त व जमाखर्च यांचे वाचन केले...यानंतर रोहा तालुका कुणबी युवक मंडळाचे अध्यक्ष अनंत थिटे, यशवंत हळदे, श्यामभाऊ लोखंडे, रविंद्र मरवडे, बबन म्हसकर, यांची परविक्षक म्हणून नेमणुक करण्यात आली होती व नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली...
यावेळी प्रथम तालुका कुणबी युवक कमेटी मध्ये सुधीर बारस्कर, लहू पिंपळकर, नंदू कळमकर, योगेश खामकर, संतोष चितळकर, यांची खांब विभातून तालुका स्तरावर तसेच संघासाठी निवड करण्यात आली...तद्नंतर खांब ग्रुप कुणबी युवक मंडळ नवीन कमेटी नव्याने गठीत करण्यात आली असून शरद हरिचंद्र जाधव अध्यक्ष,तुकाराम महाडिक सचिव, भिमेश बामणे उपाध्यक्ष, दत्तात्रेय वातेरे उपाध्यक्ष, नितीन जाधव खजिनदार, शरद दिसले सहसचिव, ललित म्हसकर सहसचिव, कल्पेश पवार प्रसिद्धी प्रमुख, तर सल्लगार पदी बबन म्हसकर, रविंद्र मरवडे, दिलीप लाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली...तसेच नव्याने निवड कऱण्यात आलेल्या कमितीचे उपस्थित समाज बांधवांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या...
