कोलाड (श्याम लोखंडे)
खा. तटकरेंकडे धाव घेत दीले निवेदन, तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिले आश्वासन
रायगड जिल्ह्यातील उत्तर रायगड मधील बहुतांश कुणबी समाज हा जन्माने आणि कर्माने कुणबी आहे माञ कुणबी असूनही तो शासनाच्या काही विविध सोयी सुविधांपासून वंचित राहिला आहे तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कुणबी दाखले अभावी शाळा कॉलेज प्रवेश जातींच्या दाखल्या अभावी रखडलेले असून रोहा तालुक्यातील बहुसंख्य कुणबी समाजाच्या वतीने आज रविवारी 21 जुलै रोजी रायगडचे कर्तव्यदक्ष खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत याबाबतचे निवेदन दिले तर दिलेल्या निवेदनावर लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी समन्वय साधून लवकरच तोडगा काढण्याची या समाजाला आश्वासन दिले आहे...
सदरच्या निवेदनात असे म्हटले आहे की कुणबी समाज OBC मध्ये समाविष्ट आहे. तथापि बहुसंख्य कुणबी समाज बांधव हे जातीच्या दाखल्यांअभावी OBC सवलतींपासून वंचित आहेत. जातीचे दाखले काढणे व जात पडताळणीसाठी शासनाकडून १९६७ पूर्वी नोंद असल्याचा पुरावा मागण्यात येतो. तथापि जन्माने व कर्माने कुणबी' असूनही पालकांचे. अज्ञान व आशक्षितपणामुळे आमच्या नोंदी दप्तरी कुणबी 'ऐवजी 'मराठा' लिहिल्या गेल्या आहेत. हिच तांत्रिक चुक समाजाला घातक ठरली आहे...
या अनुषंगाने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची शासनाने दखल घ्यावी व आम्हांला न्याय मिळावा यासाठी रोहा तालुक्यातील हजारो कुणबी समाज बांधवांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दि. १४/१२/२०२३ रोजी शासनाला सादर केले. मात्र दुदैवाने आजपर्यंत समाज- बांधवांच्या मागण्यांची दखल शासनाकडून घेतली गेली नाही, त्यामुळे समाज बांधवांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे...
ओबीसी कुणबी दाखले मिळत नसल्याने आज शेकडो मुला-मुलींचे शाला। कॉलेज प्रवेश जातीच्या दाखल्यांअभावी रखडले आहेत. अनेक तरुणांची सरकारी नोकरीची स्वप्ने भंग पावली आहेत तर सर्व- सामान्य समाजबांधव शासनाच्या योजनांचा लाभ घेऊ शंकत नाहीत. कुणबी दाखला हा कुणबी समाजाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने रायगडचे खासदार सुनील तटकरे साहेब आपण लक्ष घालावे असे विनंतीपूर्वक निवेदन कुणबी समाजाच्या वतीने देण्यात आले...
जातीच्या दाखल्यासाठी व जातपडताळणीसाठी १९६७ पूर्वीच्या पुराव्याची तांत्रिक अडचणीची बाब लक्षात घेऊन तत्सम विभागात अट शिथिल करावी.
वास्तविक पाहता मंडळ आयोग दिनांक ७/८/१९९० पासून लागू झाला. तो लागू होण्याच्या अगोदरच आमच्या नोंदी कुणबी 'झालेल्या आहेत. त्यामुळे मंडळ आयोग लागू होण्यापूर्वीच्या 'कुणबी नोंदी ग्राहय धरण्यात याव्यात.गृह चौकशी करुन जातीचे दाखले देणे व जात पडताळणीसाठी संबंधित विभागाला शासन स्तरावरुन आदेश निर्गमित करावेत.उपरोक्त बाबींसाठी आपण शासन स्तरावरुन तातडीने कार्यवाही करुन आम्हां समाज बांधवांना लवकरात लवकर न्याय द्यावा असे सदरच्या निवेदनात म्हटले आहे.
रायगड जिल्ह्यातील विशेषतः उत्तरेकडील रोहा, सुधागड, अलिबाग, मुरुड, कर्जत, खालापूर ,उरण,पेण पनवेल या तालुक्यातील बहुसंख्य कुणबी समाजाला जातीचा दाखला मिळत नसल्याने तसेच त्याची शासनाच्या अटीशर्तीमुळे जात पडताळणी होत नसल्याने शिक्षणापासून येथील विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे तसेच हा दाखला नसल्याने येथील समाजाला तसेच त्यांच्या मुलांना शैक्षणिक लाभ मिळत नाही यासाठी रोहा तालुक्यांतील आसंखे कुणबी समाजाचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना त्यांच्या सुतारवाडी येथील गिताबाग निवासस्थानी भेट घेत दिले.
यावेळी ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे रायगड जिल्हा तथा कुणबी नेते अध्यक्ष सुरेश मगर रोहा तालुका कुणबी समाजाचे अध्यक्ष रामचंद्र सपकाळ, माजी अध्यक्ष शिवराम शिंदे, शंकर भगत, सुहास खरीवले, अनंत थिटे,गुणाजी पोटफोडे, केशव भोकटे, अनंत थिटे, अमित मोहिते, दत्ताराम झोलगे, मंगेश देवकर, रमन कापसे, ज्ञानेश्वर साळुंखे, दिवाण सानप, संजय सानप, निवास खरीवले, अरुण अगले, अजय कापसे, विजय पवार,राजेश कदम सह तालुक्यातील कुणबी समाज नेते गण तसेच कुणबी युवक मंडळाचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
