महाराष्ट्र वेदभुमी

१६ वर्षीय मुलीचा ४८ तासांत शोध, रोहा पोलीसांची धडाकेबाज कारवाई!



शहानवाज मुकादम/रोहा

कर्नाटक राज्यातून मुलीचा शोध घेऊन दिले आईवडिलांच्या ताब्यात..

रोहा: तालुक्यातील सानेगाव आश्रम शाळेत शिक्षण घेत आसलेली कु. रेश्मा शांताराम शिद वय वर्ष १६ रा.खैरवाडी,पो. रामराज ता.अलिबाग ही दि:14/07/2024, रोजी वेळ ०१ च्या सुमारास सानेगाव बस स्टैंड वरून कोणीतरी अज्ञात इसमाने कु. रेश्मा अल्पवयीन व अज्ञान आसल्याचा फायदा घेवून पळवुन नेळे ची फिर्याद कु.रेश्मा ची आई संगीता शिद हीने रोहा पोलीस ठाण्यात दिली होती...

 शिद यांच्या फिर्यादीवरून कॉ.गु.र.नं.145/2024,बी, एन,एस,कलम 137(2) प्रमाणे रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन मा.पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोना/सुनील शिरसाठ व पोशि/प्रतिक तेलंगे यांनी तपास सुरू केला होता...

 पोलीसांकडून तांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर 48 तासात शोध घेऊन मा.पोलीस निरीक्षक श्री देवीदास मूपडे, यांचे मार्गदर्शनाखाली तपाशी अंमलदार  पोना/1196 सुनील शिरसाठ व  त्यांचे सोबत पोशि/860 प्रतीक तेलंगे यांनी दुसरे राज्यात जाऊन कलबुर्गी कर्नाटक येथून कर्नाटक पोलीसांची मदत घेऊन सदर मुलीस आपले ताब्यात घेऊन रोहा पोलीस ठाण्यात घेवून आले...

 तसेच सदर अल्पवयीन मुलीस विचारपूस केली आस्ता तिची सानेगांव, रोहा येथील आश्रम शाळेत शिकण्याची इच्छा नसताना तिचे आईवडिलांनी तिला, तिचे इच्छे विरुद्ध आश्रम शाळेत शिकायला ठेवले होते...

 त्यामुळे सदर मुलगी ही दि. 14/07/2024 रोजी दुपारी 13.00 वाजता सनेगाव नाक्या वरून ती एकटी त्यांचे घरगुती संबंध असलेल्या  गौरम्मा सैदलप्पा पेंट्यामिनी रा.मेडक ता. सेंडल जि. कलबुर्गी राज्य कर्नाटक येथे गेली असल्याचे सांगत असून तिला तिचे आई संगीता शिद व वडील शांताराम शिद यांच्या ताब्यात  देण्यात आली आहे...पोलीस निरीक्षक श्री.देविदास मुपडे यांचे मार्गदर्शनाखाली टीम ने 48 तासांत सदर चा तपास केल्याने रोहा पोलीसांच्या या धडाकेबाज कारवाई चा कौतुक चाहोबाजुस ऐकावयास मिळत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post