महाराष्ट्र वेदभुमी

विश्व हिंदू परिषद-उरण प्रखंड अंतर्गत दुर्गा-वहिनी व मातृ शक्ती जागरणास्तव हिंदू बांधवांचा वृक्षरोपण उपक्रम


उरण/ २१ जुलै/अजय शिवकर

 विश्व हिंदू परिषदेच्या समूहाचे संपूर्ण भारतात ठिकठिकाणी अनेक आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य केले जातात...रविवार दिनांक २१ जुलै रोजी समाज हितार्थ काळाची गरज म्हणून गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून  विश्व हिंदु परिषद उरण प्रखंड तर्फे तब्बल ५० फळ झाडांचे वृक्षारोपण एन आय हायस्कूल शाळेच्या मैदानात तसेच उरण नगर परिषद शाळेच्या मैदानात करण्यात आले...कार्यक्रमा साठी दुर्गा शक्ती,माता भगिनींनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे भाग घेतला..

या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी  एक दिवस अगोदर शनिवारी दुपारी ४ वाजता एन आय हायस्कूल जवळ मातीत  दुर्गा,माता भगिनी आणि विश्र्व हिंदू परिषद उरण प्रखंड कुलाबा जिल्ह्याचे कार्यकारी सदस्य यांनी झाडे लावण्यासाठी  एक दिवस अगोदरच खड्डे  करून घेतले..विश्र्व हिंदू परिषद उरणचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post