कर्जत/ १५ जुलै/अजय शिवकर
मोठे वेंणगाव कर्जत येथे अॅड गोपाळराव शेळके यांच्या संयोजनाने कोमसाप कर्जत शाखेतर्फे शहीद भगतसिंग स्मृतिदिनानिमित्त आनंदमय पावसाळी सहल व ४३ व्या काव्यसंमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले... उत्तम व्यवस्था,कविंचा योग्य सन्मान,चवदार भोजन, पावसातील सहल आणि काव्यसरींचा पाऊस यामुळे सर्वांना खूपच मजा आली...
प्रमुख संयोजक अॅड गोपाळराव शेळके आणि त्यांचे कुटुंबीय यांना सॅल्युट!! असे उद्घाटक रायगड भूषण प्रा.एल बी पाटील यांनी काढले.. कार्यक्रमात पाहुणे प्रभाकर शेळके, भूषण पाटील , संदीप पाटील, जयपाल पाटील ,विजय घोसाळकर, जयवंत पाटील,उज्ज्वला दिघे, वामन दिघे ,लवेंद्र मोकल,गज आनन म्हात्रे, व इतर मान्यवर होते...
यावेळी रायगड भूषण प्रा.एल बी पाटील आणि जयपाल पाटील यांना कोमसाप कर्जत शाखेतर्फे रायगड साहित्य रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..
कवीं अजय शिवकर,जयश्री पोळ,अनिल भोईर, ज्ञानेश्वर वाडिले,अनिल रानडे,भरत पाटील,भारती ढाकवळ,सतिश शेळके,वनिता गायकर, जनार्दन परांजपे, लक्ष्मण अभ्यंगे, अशा अनेक कवींनी भाग घेवून दर्जेदर कविता सादर केल्या...
काव्य संमेलनाचे अध्यक्ष- पत्रकार तथा कोमसाप जिल्हा प्रतिनिधी गणेशजी कोळी होते...कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी- शिव व्याख्याते प्रशांतजी देशमुख आणि आपत्ती निवारण सदस्य कवी जयपाल पाटील होते.. तसेच निवेदक म्हणून श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे आणि जनार्दन सताणे यांनी सूत्रे सांभाळली...
विशेष म्हणजे प्रत्येक तालुक्यातील दोन कार्यरत सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला...ऑनलाईन सदस्य अनिल भोईर, अजय शिवकर, अनिलकुमार रानडे, भरत पाटीलयांचा विशेष सन्मान ,तर झाला...३७ कवी आणि ८ बालकवी यांच्या कविता ऐकण्याचा आनंद लुटायला मिळाला...





