महाराष्ट्र वेदभुमी

कोंमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये अनोख्या बेंच चे लोकार्पण

 


सारडे प्रतिनिधी (नागेश म्हात्रे)

 कै.नरेश रघुनाथ कडु यांच्या स्मरणार्थ सुमन नरेश कडु (सोनारी) यांस कडून कोमनादेवी ऑक्सिजन पार्क पर्यटकांना चर्चा करण्यासाठी एक आनोख्या आसन व्यवस्थेचं आयोजन करण्यात आले आहे...


कोमणादेवी ऑक्सिजन पार्क मधील पर्यटकांचा वाढता ओढा पहाता या ठिकाणी आलेला पर्यटक हा अनेक गोष्टींचा आनंद घेत आहे...त्यात आज या पार्कमध्ये सुंदर अशा आसन व्यवस्थेच आयोजन सारडे विकास मंच तसेच सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठान उरण याच्या संकल्पनेतून करण्यात आले..


यासाठी आर्थिक मदत ही कै.नरेश रघुनाथ कडु यांच्या स्मरणार्थ सुमन नरेश कडु (सोनारी) यांच्यामार्फत केले गेले आहे...नक्कीच गेल्या दहा वर्षात हा पार्क सर्वांना परिचित आहे.. आणि यामध्ये एक एक नवीन संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी सारडे विकास मंच हा प्रयत्न करीत आहे... त्यांच्या प्रयत्नाला अनेक निसर्गप्रेमींचे सहकारी लाभलेला आहे.. आज या पार्कमध्ये आल्यानंतर पर्यटकांना बसण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी नक्कीच आकर्षण ठरेल अश्या आसन व्यवस्थेचे आयोजन करण्यात आले...


यासाठी सारडे विकास मंच तसेच कोमणादेवी ऑक्सिजन पार्कचे निर्माते नागेंद्र म्हात्रे, सदाबहार दोस्ती ग्रुपचे हरिश्चंद्र म्हात्रे , संतोष जोशी, सचिन पाटील , विजय म्हात्रे, प्रितेश म्हात्रे, किशोर पाटील ,भावज्या सई अनुज तसेच पर्यटक म्हणून आलेले संचित गावंड जीवन पावसकर, मनीष मोकल प्रणव म्हात्रे, सोनीक ठाकूर, प्रतिश म्हात्रे ,विशाल म्हात्रे ,नितेश पाटील. संतोष पाटील हेमा पाटील ह्याच मोलाचं सहकार्य लाभले हे आकर्षक आसन व्यवस्था तयार करण्याचं काम अगदी स्वस्तामध्ये प्रितेश म्हात्रे सारडे यांनी केलेले आहे.. खरोखरच ही सुंदर आसन व्यवस्था आज पार्कमध्ये बसवण्यासाठी अनेकाचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी आभार मानले..



Post a Comment

Previous Post Next Post