महाराष्ट्र वेदभुमी

काँग्रेस पक्षाचे माजी आ.मधुकर ठाकूर यांना जयंती व तृतीय स्मृती दिनानिमित्त अनेकांचे अभिवादन

 सोगाव - अब्दुल सोगावकर :  

गोर गरिबांचे कैवारी असलेले अलिबाग उरण मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या १५ जुलै रोजी जयंती व तृतीय स्मृती दिनानिमित्त सातिर्जे येथील स्मृती स्थळावर मतदारसंघातील अनेक मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले...

       यावेळी माजी आमदार मधूशेठ ठाकूर यांनी केलेल्या राजकीय व सामाजिक कार्यांचा तसेच गोरगरिबांच्या केलेल्या सेवांबाबत त्यांच्या आठवणींना अनेक उपस्थित मान्यवरांनी भावुक होत उजाळा दिला...

          त्यांच्या अलिबाग तालुक्यातील मूळगावी सातीर्जे येथील स्मृतिस्थळावर आवर्जून अभिवादन करण्यासाठी चोंढी येथील ज्येष्ठ समाजसेवक सुधीर उर्फ बाळू गायकवाड, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, तुषार पाटील, जगे गॅस एजन्सीचे कैलास जगे, संतोष पेडणेकर, विलास पाटील, ऍड. कौस्तुभ पुनकर, कैलास गजणे, किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, डॉ. किरण शेटे, माजी जिल्हा परिषद सदस्य काका ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव प्रविण ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, शिवसेना(उद्धव ठाकरे गट) नेते आमिर उर्फ पिंट्या ठाकूर, सातिर्जे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्राची ठाकूर, सातीर्जे उपसरपंच उमेश ठाकूर, समीर ठाकूर, रवींद्र ठाकूर, समीर ठाकूर, नदीम आत्तार, सम्राट ठाकूर, दिनेश भोईर, रुपेश लाड, सुबोध नाईक, महेश नाईक, पार्थ पाटील यांच्यासह संपूर्ण ठाकूर कुटुंबीय व इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते...

फोटो लाईन :माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या जयंती व तृतीय स्मृती दिनानिमित्त अभिवादन करताना मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post