महाराष्ट्र वेदभुमी

महसुल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप



सचिन चौरसिया रामटेक

महसुल कर्मचारी संघटनेमार्फत आंदोलन

रामटेक : महसुल कर्मचारी संघटनेच्या शासनाकडे मागील अनेक दिवसापासुन विविध मागण्या प्रलंबित आहेत... यामुळे संघटनेकडुन टप्प्याटप्य्याने आंदोलनाला सुरुवात झाली... रामटेक तहसील चे महसुल कर्मचाऱ्यानी प्रमुख मागन्या करिता १५ जुलै पासुन बेमुदत संप पुकारला आहे... 

दांगट समितीच्या अहवालातील शिफारशींनुसार सुधारित रिपोर्ट लागू करण्याची आणि कोणत्याही संवर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी न करण्या ची मागणी केली... वरिष्ठ लिपिक व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नती द्यावी...

पुरवठा विभागातील भरतीमुळे रिक्त झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे... राजस्व सहाय्यक ग्रेड पे रुपये १९०० ते २४०० रुपये करावे...

महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांची तपासनी ही लेखाधिकाऱ्यांऐवजी महसूल विभागात नियुक्त लेखाधिकाऱ्यांच्या  अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी. नायब तहसीलदार संवर्ग श्रेणी वेतन ४८०० रुपये प्रति महिना करावे...

नायब तहसीलदार किंवा अव्वल कारकून व मंडल अधिकारी यांची पदोन्नती, विभागीय परीक्षा आणि प्रत्यक्ष सेवा ७०:१०:२० या प्रमाणात व्हावी...

तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना २५% पदोन्नती द्यावी... आदि मागण्या करिता  बेमुदत संप पुकारला आहे... संपा मध्ये राजू तडस, मोरेश्वर टेकाम, राजू परतेकी, अलका ठवरे, छाया बुधे, सुधीर कांबळे, विजय साबळे, गजानन वीर, सुनील जाधव, आरती चौरसिया, धीरज बागडे, पूनम लेंडे या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला...

Post a Comment

Previous Post Next Post