महाराष्ट्र वेदभुमी

पाल्याचा शिक्षणासाठी पत्रकार सभासदांना शैक्षणिक किटचे वितरण


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :-  व्हॉइस ऑफ मीडिया ची मौदा तालुका कार्यकारणीची बैठक नुकतीच कोदामेंढी येथील सियाराम लाँन येथे घेण्यात आली...बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष संदीप गौरखेडे होते... व्हॉइस ऑफ मीडिया च्या कार्यपद्धती आणि कृतीबद्ध आराखडा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले... पत्रकारांचे हित जोपासण्याचे काम व्हॉइस ऑफ मीडिया संघटना करित असून यातच पत्रकार सभासदांचे भवितव्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले...

        ज्यांनी आपल्या पाल्यासाठी शैक्षणिक किटची मागणी केली होती आणि ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्वरुपात फॉर्म भरले होते अशा निवडक पत्रकार सभासदांना शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी सभासदांना ओळखपत्र वाटप करण्यात आले...

        १ जुलै २०२४ पासुन शासनाच्या वतीने नविन कायदे धोरण अंमलात आणण्यात आले... याबाबत सविस्तर मार्गदर्शन अरोलीचे ठाणेदार निशांत फुलेकर यांनी उपस्थित पत्रकारांना केले. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप गौरखेडे, उपाध्यक्ष दिलीप इंगोले, उपाध्यक्ष नारायण जर्वेकर, संघटक दयालनाथ नानवटर, सरचिटणीस मुकेश कांबळे, प्रसिद्धीप्रमुख तुकाराम लुटे, रामटेकचे उपाध्यक्ष रुपेश वनवे आदीसह पदाधिकारी यावेळी होते...

Post a Comment

Previous Post Next Post