सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : रामटेक शहरात शंभराच्या संख्यानी प्लॉटची जागा खाली असुन, या जागेवर अधिक प्रमाणात झाडे, गवत उगवला आहे... शिवाय त्याखाली प्लाँटवर घरातील, बगीच्यातील कचरा टाकुन कचर्याचा ढिक करतात... तो कचर्याचा ढिक पावसाळ्यात सडल्यामुळे आजु-बाजुच्या नागरीकांना घाणेरडा वास सहन करावा लागत आहे... झाडे, गवत ,कचरा वाढल्याने किटक व कचरा सडल्याने मच्छरांचा प्रकोप वाढत आहे... त्यामुळे डेंगु, मलेरीया या रोगाचे प्रमाण वाढत आहे...
आजु-बाजुचे नागरीक तिथल्या खाली प्लाँटमधील झाडे, गवत व कचरा काढत असुन पुन्हा झाडे, गवत उगवतात... शिवाय दुसरीकडे प्लाँट मालक त्यांच्या प्लाँटवर उगवलेले झाडे, गवत, व कचरा साफ-सफाई करण्यासाठी उत्साह दाखवत नाही... बस स्टैंड जवळील सुभाष वार्ड येथील जेष्ठ नागरीक रमेश चौकसे व अन्य नागरीक यांच्या घरासमोरील खाली प्लाँटवर उगवलेली झाडे गवत व नागरीक कडुन तयार होणारा कचर्याचा ढिग यामुळे खुप त्रास होत आहे... या सर्व गोष्टीसाठी नगरपरीषद यांनी खाली प्लाँट मालक धारकांना साफ- सफाई करण्याचे आदेश देवून योग्य ती कार्यवाही करावी...
