महाराष्ट्र वेदभुमी

खोडगाव जि. प. प्राथमिक शाळेत शाळा पुर्व तयारी मेळावा


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :-तालुक्यातील काचुरवाही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खोडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक ४ जुलै रोजी शाळा पुर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते...

         यामध्ये वर्ग पहिली मध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन खाऊ वाटप करण्यात आले तसेच त्यांच्याकडून वस्तुंची ओळख करून त्यांना अभ्यासाबाबद विचारणा करण्यात आली. यावेळी सरपंचा सविता सुभाष नागोसे, माजी सरपंच शिशुपाल अतकरे, शा. शि. अध्यक्ष अंबादास गायकवाड अध्यक्ष, दिगांबर आडकने, पितांबर पानतावणे, कोमेंद्र लसुंते, योगेश आडकने, विनोद गायकवाड, तसेच शाळेचे मुख्याध्यापक कोडवती सर, शिक्षक वरठी सर, लक्ष्मी आडकने, अनिता खेरगडे , भारती पानतावणे, लताबाई बोबडे, तसेच गावातील महिला पुरुष पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post