महाराष्ट्र वेदभुमी

जयसेवा हायस्कुल पवनी येथे वृक्षारोपण

 


सचिन चौरसिया प्रतिनिधी

 रामटेक:-तालुक्याच्या आदिवासीबहुल भागातील जयसेवा आदर्श हायस्कूल, पवनी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच दि. ६ जुलै रोज शनिवारला घेण्यात आला. त्याप्रसंगी जि. प. नागपूर सदस्य श्री. हरीशभाऊ उईके व सरपंच सौ छायाताई भट्टी प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते...

        कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दुर्गावतीताई सरियाम उपस्थित होत्या. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सीड -बॉलचे सुद्धा रोपण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम श्री धोटे सरांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक राहुल कळंबे सरांनी केले तर आभार प्रदर्शन कु. राऊत मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षिका, शिक्षेकेत्तर कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post