प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा
वनविभाग रोहा , वनविभाग मुरुड परिमंडळ चणेरा यांच्यामार्फत दि. १५ ते ३० सप्टेंबर हा कालावधी वन महोत्सव म्हणून सादरा केला जातो . या कालावधीत वृक्ष लागवड व वृक्षदिंडी काढून वनाचे महत्व पटवून दिले जाते . तसेच आजच्या पिडीला वनाचे महत्व समजण्यासाठी शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभागी घेऊन युवक वर्ग यांनी पुढे येऊन सामान्य जनते पर्यंत या उपक्रमाचे महत्व पोहचविणे गरजेचे आहे...
या उपक्रमामुळे जी.डी.टी. फ्युचर स्कुल सुडकोली येथे कार्यक्रम आयोजित केला . या वेळी स्कुलचे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष संदिप तटकरे , सचिव प्रकाश सरकले , संचालक देवेंद्र चांदगावकर , जी. डी. टी. फ्युचर स्कूल आणि जुनियर कॉलेजच्या प्राचार्य नुरिना शिंगरे , शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मिळून पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली .
प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी मुरुड प्रियंका पाटील , नवपाल आर. जी. गायकवाड , व्ही.जी. वाघमारे , वनरक्षक गोविंद खेडकर , इंधे , त्रिभूवन उपस्थित होते .

