कोलाड (श्याम लोखंडे)
केंद्र व राज्य शासन परिपत्रकानुसार दि 1 जुलै 2024 ते 10 जुलै 2024 या कालावधीत इको क्लब फॉर मिशन लाईफ ( Eco clubs for Mission Life ) या थीमवर आधारित आरोग्यदायी जीवनशैली स्विकारणे, शाश्वत अन्नप्रणाली , ई - कचरा कमी करणे,ऊर्जा बचत करणे, पाणी बचत करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे अशा 7 थीमवर आधारित विविध उपक्रम शाळा स्तरावर राबवण्याचे निर्देशित केले आहे....
यामधील शाश्वत अन्नप्रणाली स्विकारणे या उपक्रमांतर्गत रोहा तालुक्यातील नाविण्यपूर्ण उपक्रमशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंगळसई केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ .रश्मी साळी मॅडम यांच्या संकल्पनेतून व नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर पूरक व व्यावसायिक शिक्षणाची जोड द्यावी या उद्देशातून रोहा तालुक्यात गुरुवारी दिनांक 4 जुलै 2024 रोजी वांदोली येथील श्री. दिनेश कडव यांच्या शेतामध्ये शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ व शेतकरी यांच्या समवेत कृषी क्षेत्रातील जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली पिंगळसई केंद्रातील शिक्षकांसाठी शेतशिवार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती...यावेळी शेतीविषयक कामे कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शिक्षकांना देण्यात आले व लवकरच यानुसार पिंगळसई केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी पालक,गावातील जाणकार कृषीप्रेमी ,शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षणप्रेमी यांच्या सहभागातून प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ .रश्मी साळी मॅडम यांनी यावेळी दिली...
पिंगळसई केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ.रश्मी साळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेत पिंगळसई, वांदोली, वांदोली आदिवासीवाडी, सोनगाव, गावठाण, धामणसई, मालसई, मालसई आदिवासी वाडी, मुठवली खुर्द,उडदवणे, बाहे, देवकान्हे इ .शाळांनी ह्या उपक्रमात सहभाग घेतला.केंद्रातील शिक्षक हि.का. पाटील सर, जयेश भोईर सर, दिनेश कडव सर, शशिकांत शेळके सर, अनिल सुटे सर, संतोष धोत्रे सर, ब्रिजेश भादेकर सर, महेंद्र शिंदे सर, दिपक मांडलुस्कर सर विठ्ठल हाके सर , हरिभाऊ आंधळे सर, रोहकले सर,वैशाली वेळे मॅडम, पुष्पलता शिंदे मॅडम, साधना आंबेकर मॅडम, राळेभात मॅडम,सुनिता महामुनी मॅडम, रोहिणी गायकवाड मॅडम, इंगळे मॅडम,रुपाली नांदुरे मॕडम यांनी सक्रिय सहभाग घेतला...
तसेच यात नांगरणी,भाताच्या राबातुन भात खणणे,मुठ बांधणे,प्रत्यक्ष भाताची लागवड करणे इ.शेतीच्या कामाचा शिक्षकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.तर शेताच्या बांधावर बसून जेवणाचा आनंद उपस्थितांनी उपभोगला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षकांचे योगदान लाभले.वांदोली शाळेचे शिक्षक श्री दिनेश कडव त्यांच्या कुटूंबीयांचे विशेष सहकार्य लाभले.याबद्दल केंद्रप्रमुख रश्मी साळी मॕडम यांनी आभार मानले...
