सोगाव - अब्दुल सोगावकर :
अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील राजिप मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवार दि.२३ जून रोजी राजिप शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले..यावेळी शाळेच्या आवारात विविध प्रकारची २० फळझाडे लावण्यात आली...
एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला... सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी त्याकाळी मोठ्या कष्टाने व केलेल्या काटकसरीने मराठी माध्यमातून शिक्षण घेतले होते... आपल्या मुलांना याच शाळेत शिकायला ही पिढी पुढे येत नसल्याची खंत अनेकांनी यावेळी व्यक्त केली...
यावेळी वृक्षारोपण करताना माजी विद्यार्थ्यांमध्ये मापगाव तंटामुक्त उपाध्यक्ष निसर्ग राऊत तसेच प्रसाद राऊत, रूपेश थळकर, नितेश राऊत, अक्षय राऊत, प्रसन्न खोत, प्रथमेश थळकर, गौतम कोळपे, सागर कोळपे, अक्षय कैलकर, अजित माने, अजिंक्य गोंडाळ, अजय पवार, समीर नाईक, केतन माने आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते...
फोटो लाईन : मापगाव येथील राजिप मराठी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करताना उपस्थित माजी विद्यार्थी,