महाराष्ट्र वेदभुमी

किर्तनकर ह.भ.प. प्रभावती जाधव यांचे दुःखद निधन.

 


  नागोठणे :- विशेष प्रतिनिधी 

पाली सिद्धेश्वर येथील रहिवाशी तथा किर्तनकार ह.भ.प. प्रभावती विठ्ठल जाधव यांचे गुरुवार दि. २० जुन २०२४ रोजी दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्या ८५ वर्षाच्या होत्या. त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होत्या. वारकरी परंपरेचा वारसा असल्याने किर्तन,हरिपाठ,भजन यांची त्यांना आवड होती.तर त्या स्वतः किर्तनकार व प्रवचनकार होत्या.त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायत पोकळी निर्माण झाली असून जाधव परिवारावर दुःखाचे डोंगर तर परीसरात शोककळा पसरली आहे...

त्याच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे नातेवाईक,सामाजिक, राजकीय,शैक्षणिक तसेच वारकरी संप्रदायाचे असंख्य नागरिक व समस्त सिद्धेश्वर ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मच्छिद्र जाधव, पंढरीनाथ जाधव ही दोन मुले ,वर्षा जांबेकर ही एक मुलगी,सुना,नातवंडे व मोठा जाधव परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि. २९/६/२०२४ तर उत्तर कार्य विधी मंगळवार दि २/७/२०२४ रोजी त्यांच्या सिद्धेश्वर येथील राहत्या घरी कीर्तन प्रवचन रुपी सेवतून पुष्पांजली अर्पण करून संपन्न होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटर्तीयांनी दिली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post