सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी
रामटेक :-प्रसिद्ध रामधाम तीर्थक्षेत्रात मनसर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने आदर्श सर्वधर्मीय सामूहीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते... या समाजसेवी कार्याला आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (महाराष्ट्र शासन) यांची प्रमुख मदत लाभते...
सन २००५ पासून चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे आतापर्यंत सुमारे १२६६ जोडप्यांचे 'शुभमंगलम सावधान' रामधाम येथे झाले आहे. या वर्षी ७५ जोडप्यांचे विवाह पार पडला असता आदिवासी समाज कल्याण विभाग तर्फे धनादेश वितरण करण्यात आला...
लोकांचे आशिर्वाद मला मिळत असतात व त्या गोष्टीचा मला अभिमान आहे... मी हे समाजकार्याचे काम करत असतो त्यात लोक म्हणतात की यांचे कार्य गौरवण्यासारखा आहे... मी दरवर्षी सामूहीक विवाहाचे आयोजन करीत असतो.. मला हे कार्य करण्यात खुब आनंद मिळतो... की माझ्या हाताने गोर गरीबांचे लग्न होत असतात...
याप्रसंगी अध्यक्षस्थानी रामधामचे संस्थापक चंद्रपाल चौकसे , माजी सभापती कलाताई ठाकरे, आदिवासी सामाजिक कल्याण विभागाचे संजय सर्येम, दिपा चौहान, आधार सामाजिक संस्थाचे संजय पवार, रामचंद्र कनाके, मिथुन उईके यांची उपस्थिती होती...
