महाराष्ट्र वेदभुमी

कुंभार समाज सामाजिक संस्था खोपोली,ता. खालापूर रायगड 10वी 12वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

 


मयूर पालवणकर -:मुरुड रायगड 

!! संत शिरोमणी गोरोबा काका प्रसन्न !!

 दिनांक 18 जून 2024, मंगळवार रोजी कुंभार  समाज सामाजिक संस्था खोपोली यांनी रायगड जिल्हा अध्यक्ष श्री अनंत महाडकर साहेब  व सर्व रायगड जिल्हा कार्यकरणी यांच्या मार्गदर्शनाखाली दाहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, खोपोली येथे सर्व विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन प्रशस्ती  पत्रक, नोट बुक, पेन व पुष्पगुच्छ देऊन संपन्न झाला.  

सदर कार्यक्रम वेळी कार्यकारणी सदस्य श्री शिवाजी मोरे , श्री बाळू चित्ता, श्री प्रशांत मांगळुकर ( खजिनदार), श्री राजाराम कुंभार सर ( सचिव), श्री संजय शिर्के ( अध्यक्ष) उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post