महेश वाडकर-: धाटाव
सध्याच्या काळामध्ये झाडे कमी प्रमाणात असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे... ही परिस्थिती डोळ्यासमोर घेऊन दरवर्षीप्रमाणे बोरघर गावाचे परशुराम माने याने आपल्या वाढदिवसानिमित्त ६० झाडाची लागवड आपल्या गावातील सहकार्यासोबत बोरघर ते लांडर या ठिकाणी लागवड करण्यात आली... माने यांनी राजकारण न करता आपल्या गावासाठी आपल्या पर्यावरणाच्या हितासाठी आपल्या कढून जे करता येईल ते सध्या करताना दिसत आहे...
त्यांच्या सोबत संवाद साधला असता ते म्हणाले, वृक्ष पर्यावरणावर कसे समतोल राखते ते सांगितले...पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे...निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्व सामान्य माणसाच्या हाती असलेला एकमेव आणि सर्वात उत्तम म्हणजे पर्यावरण आणि त्याचे संगोपन ...
त्यांच्या सहकार्यामध्ये अमितजी घाग, परशुराम माने,प्रतीक भाऊ भगत,स्वप्नील भगत, विपुल भगत, विशाल भगत, प्रणित माने, प्रथमेश माने, युवराज माने, प्रसाद माने, गणेश कडव, निखिल वाळंज, विजय भगत, सागर भगत, जगदीश माने, हरेश भगत, विवेक बामुगडे,अक्षय भगत, दिवेश भगत, मनोज सुटे मैत्री प्रतिष्ठान : निलेशजी वारंगे, महेश खांडेकर, भरत महाडिक, अक्षय वारंगे, नारायण चितळकर आदी समाज सेवक होते...
