पेण/ २५ मे/ अजय शिवकर/
पेण तालुक्यातील कळवा येथे पूजा पाटील या निराधार मुलीचे लग्न पेण कोमसापचे अध्यक्ष लवेंद्र मोकल यांनी वरेडी गावच्या चि.राहुल पाटील यांच्यासोबत लग्न लावून देतांना आदल्या दिवशी हळदीच्या मांडवाला कविसम्मेलन आयोजित करून नवा पायंडा घातला...असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष रायगड भूषण प्रा एल बी पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले...
यावेळी कोमसाप कडून श्री,सौ. कलावती लवेंद्र मोकल आणि बेलवस्कर कुटुंबीय की ज्यांनी रेखा हिचा सांभाळ करून लग्न केल्याबद्दल सत्कार केला...
यावेळी धवलारीण कवयित्री सविता पाटील,मीनल माळी,यांनी सुरेल आवाजात धवले गायिले कविसम्मेलनात के.पी.पाटील, मोहनलाल पाटील, चंद्रकांत पाटील,सदानंद ठाकूर,रामचंद्र पाटील ,गजानन म्हात्रे,गणपत पाटील,अशोक मोकल, व्हि.डी.पाटील, प्रकाश ठाकूर, मोहन पाटील,देविदास पाटील , हरिश्चंद्र माळी,जी.एच ठाकूर इत्यादी ३१ कवींनी कवितांचं सुरेख गायन आणि वाचन केले...
उपस्थित मान्यवरांनी दारू नसलेल्या आगरी मांडवाचा आयुष्यात अनोखा आणि अगदी वेगळा आनंद मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या...