माणगाव -: नरेश पाटील
गुंतवणुकीतून नफा मिळवून देण्याचे आश्वासन
६ % ते ७% टक्के रक्कम प्रत्येक महिन्याला
माणगाव पोलिस ठाणे येथे आरोपी इसम संदेश सुरेश कवडे रा.वंदना अपार्टमेंट ,कचेरी रोड माणगाव ता माणगाव जिल्हा रायगड तसेच मनोज सदानंद तेटगुरे रा. साळवे ता माणगाव जिल्हा रायगड यांनी श्रीकृपा अपार्टमेंट ,विकास कॉलनी माणगाव तालुका जिल्हा रायगड. देवेंद्र पांडुरंग गायकवाड रा. निजामपूर, तालुका माणगाव जिल्हा रायगड... व संजय बाळकृष्ण गायकवाड रा.कचेरी रोड,अपना मेडिकल वरती ३ रा मजला, माणगाव तालुका माणगाव जिल्हा रायगड.यांच्यावर गुन्हा नोंद क्रमांक ११५/२०२४,भा. दं.वि सं .कलम ४२०,३४ अन्वये ,दिनांक २४/४/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला...
सदर दाखल केलेल्या गुन्ह्याचा २५ मे २०२४ पर्यंतच्या झालेल्या तपासामध्ये गुन्ह्यात वरील नमूद केलेल्या नावानुसार आरोपींनी चौघा जणांच्या भागीदारीत "आपला ॲडव्हायझरी" व "ट्रस्ट प्रायझेस" नावांनी कंपनी स्थापन करून बिझनेस ऑफिस सुरू केले असल्याचे लोकांना सांगून त्या बिझनेसमध्ये लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले... त्यानुसार लोकांनी केलेल्या गुंतवणुकीची रक्कम व्यवसायात टाकून त्या व्यवसायातील मिळणाऱ्या नफ्यातून गुंतवणूकदारांना नफ्यातून सहा टक्के ते सात टक्के रक्कम प्रत्येक महिन्याला देऊ असे सांगितले...
व लोकांचा विश्वास संपादन केले... त्यानंतर आरोपींच्याकडे त्यांच्या सांगण्यावरून गुंतवणूक करणाऱ्या लोकांना परत देण्यास टाळाटाळ करून आरोपींनी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न होत आहे...तरी वर नमूद केलेल्या आरोपींकडून अशा प्रकारची फसवणूक झालेल्या लोकांनी माणगाव पोलीस ठाणे येथे येऊन त्याबाबत तक्रार दाखल करावी... असे आवाहन माणगाव पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात येत आहे....