महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल सोमवार दि. २७ में २०२४ रोजी ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत उरण येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल ने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल १००% लागला आहे. या परीक्षेत प्रियांशी पंकज म्हात्रे हिने ८४.४०% गुण संपादन करून तिसरा क्रमांक प्राप्त केला...
यशाच्या रहस्याबद्दल प्रियांशी हिला विचारले असता, तिने सांगितले की दहावीच्या परीक्षेसाठी कोणताही कोचिंग क्लासला न जाता स्वतः अभ्यास केला तसेच स्वयम अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे मार्गदर्शन तसेच मैत्रिणीचे सहकार्य मला मिळाले... जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे शाळेचे दहावीला शिकवणाऱ्या शिक्षकांनी उत्तम मार्गदर्शन केले...
तसेच शाळेत असणारी शिस्त, जादा तास व जास्तीत जास्त असणाऱ्या सराव परीक्षा याचा मला फायदा झाला... संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे यांनी माझे शालेय प्रश्न समजून घेतले, व सोडवण्याचा प्रयत्न केला... त्यामुळे दहावीला मला चांगले यश मिळाले... भविष्यात आय, आय, टी. इंजिनिअर होण्याचे स्वप्न आहे...
या यशाबद्दल पंचक्रोशीतील प्रियांशी चे कौतुक करण्यात येत आहे. प्रियांशीचे वडील एस टी महामंडळ उरण येथे कंडक्टरचे काम करतात व आई ग्रामपंचायत गोवठणेच्या सदस्या आहेत... प्रियांशीचा आदर्श बाकीच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे मत शिक्षक, कर्मचारी,ग्रामस्थांनी बोलून दाखविले...