महाराष्ट्र वेदभुमी

प्रोफेसर विद्याधर पाटील सर यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव


सारडे- उरण/३० मे /अजय शिवकर

 शिक्षकांना राष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाचे स्थान आहे, शिक्षक म्हणजे शिक्षण व्यवस्थापन प्रक्रियेतील अतिशय महत्वाचा घटक असतो, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट होय, साहसी लोकांना  भाग्य नेहमीच साथ देत असते. सारडे गावातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व श्री विद्याधर पाटील सर गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात अविरतपणे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अध्यापनाचे कार्य करत आहेत याचीच दखल  घेत २७ मे २०२४ रोजी लोणावळा येथील मनशांती केंद्रा मध्ये महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाकडून दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले...

यामध्ये को.ए.सो. वि. खं. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पनवेल येथील कार्यरत श्री.विद्याधर हरिश्चंद्र पाटील सर यांना  सावित्रीबाई फुले विश्वविद्यालय पुणे येथील विभाग अध्यक्ष माननीय. डॉ. विजयकुमार रोडे सर व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ.मिलिंद कांबळे सर यांच्याकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला...

 सदर पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post