महाराष्ट्र वेदभुमी

तेलंगणा राज्यातील मालमत्तेविरुद्ध दाखल गुन्ह्यातील आरोपींना माणगाव पोलीसठाणे रायगड यांनी केले गजाआड

 


 माणगाव :नरेश पाटील

पहाडे शारीफ पोलीस ठाणे काँ . गु रं. नं.२८२/२०२४ भा.द.वि.सं कलम ३९२ प्रमाणे हा गुन्हा दिनांक २४/ ५/ २०२४ रोजी ५:.५० वाजताच्या सुमारास मौजे मनकालगाव तालुका महेश्वरम जिल्हा रीचकोंडा राज्य तेलंगणा येथे घडला असून तो दिनांक २४/५/२०२४ रोजी ८:०० वाजता दाखल आहे... सदर गुन्ह्यात यांतील फिर्यादी श्रीमती गड्डमेदी कल्पना महेंदर हे मॉर्निंग वॉक करता गेले असता त्यांचा गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तिने हिसकावून चोरून नेली आहे... असे दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपीत नाव १) धनला.बाबू बालाजी गायकवाड रा.मुबाराक नगर निजामबाद मूळ रा. खारपुर ता. देंगलुर जि. नांदेड २)समशेर सिंग चतुर सिंग टाक रा. बिचुकुंडा निजमाबाद राज्य तेलंगणा हे सदर गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवत असून इतर राज्यात फिरत असून त्यांच्यावर तेलंगणा राज्यात मालमत्तेविरुद्धाचे गुन्हे (चोरी, दरोडा, जबरी चोरी ,घरफोडी) असे एकूण ३७ गुन्हे  दाखल  करण्याचे असल्याबाबत संबंधित पोलिस ठाणेकडून माहिती प्राप्त झाली होती.. 

      सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता मा .पोलिस अधिकारी श्री सोमनाथ घार्गे, मां अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री पुष्कराज सूर्यवंशी  यांच्या मार्गदर्शनाखाली  श्री राजेंद्र पाटील ,पोलिस निरीक्षक माणगाव पोलिस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाणे स्तरावर पथके तयार करण्यात आली होती...त्याचप्रमाणे प्राप्त माहितीच्या अनुषंगाने हद्दीत गस्त वाढविण्यात आला होता... त्यावरून त्यावरून नमूद.गंभीर गुन्ह्यातील आरोपीत हे माणगाव रेल्वे स्टेशन येथे असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत  मिळाल्याने  सदर ठिकाणी तत्काळ तपास तयार करण्यात आलेला तपास पथकांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून  त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे..

      त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सबांधीत आरोपी यांनी चोरी घरफोडी जबरी चोरी  असे अनेक गुन्हे  दाखल असल्या बाबतची कबुली दिल्याने सदर आरोपींत यांना पहाडी शरिप पोलिस ठाणे जि रूचिकोंडा राज्य तेलंगणा तपासिक  अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे..

    सदरची कारवाई मा .पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे  यांच्या मार्गदर्शनाखाली मा.अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व मा. उपविभागीय पोलिस अधीकारी श्री पुष्कराज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली माणगाव पोलिस  ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री राजेंद्र  पाटील , महिला पोलिस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, पोलिस उपनिरीक्षक किर्तिकुमार गायकवाड पोहवा ७०९/रावसाहेब कोळेकर पोशी १९०५/डोईफोडे पोशि ३९९/ माटे पोशि ४८८/पोशि ८२५/ बोरकर पोशि १३४४/पवार यांनी पार पडली आहे..

Post a Comment

Previous Post Next Post