महाराष्ट्र वेदभुमी

चोरढे येथे दोन दिवसीय योगशिबीर यशस्वीरित्या पूर्ण

 


शरद पाटील -: मुरुड

नमो काडसिद्धेश्वराय

गुरुकुल आरोग्य योगपीठ (सिद्धगिरी कणेरी मठ कोल्हापूर) व श्री. स. स. काडसिद्धेश्वर सांप्र. गुरुभक्त मंडळ चोरढे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 व 27 मे 2024 रोजी मुक्काम चोरढे येथे हनुमान मंदिरात दोन दिवस विनामूल्य योग शिबीर घेण्यात आले...

   सदर शिबिरात योगाचे महत्व, उद्दिष्टे तसेच कराटे, लाठीकाठी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले... सदर शिबिरात मा. श्री. चंद्रकांत खोत (भाऊ), राज्यस्तरीय कामगार भूषण पुरस्कार विजेते प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले... तसेच राष्ट्रीय स्तरावरील योगपट्टू प्रशिक्षक मा. श्री. उत्तम मांदारे यांचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन झाले... सदर शिबिराचे आयोजन श्री. स. स. काडसिद्धेश्वर गुरुभक्त मंडळ चोरढे यांनी केले आणि उदघाटन ग्रुप ग्रामपंचायत चोरढे सरपंच सौ. तृप्ती ऋतिक घाग, सदस्य श्री. अनिल नारायण चोरढेकर, सदस्या सौ. प्रमिला चंद्रकांत चोरढेकर तसेच आगरी समाज मंडळ चोरढे अध्यक्ष श्री. सुनिल सुदाम घाग व चोरढे ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले...

कार्यक्रमाशेवटी मा. श्री. अनिल नारायण चोरढेकर ग्रामपंचायत सदस्य यांनी दिलेला अल्पोपहार घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला...

सदर योग शिबीर कार्यकामासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेल्या सर्वांना आयोजकांकडून खूप खूप आभार व धन्यवाद देण्यात आले..

Post a Comment

Previous Post Next Post