महाराष्ट्र वेदभुमी

जिल्हाधिकारी किशन जावळे यांची पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीला सदिच्छा भेट

 

माणगाव :- (नरेश पाटील) 

गुरुवार दि. २३ मे रोजी माननीय जिल्हाधिकारी (रायगड) किशन जावळे हे माणगांव प्रवासात आले होते...त्यादरम्यान कोरियन बहुराष्ट्रीय कंपनीत जिल्हाधिकाऱ्यांची दोन तासांपेक्षा जास्त भेट ठरविण्यात आली होती... सोबत माणगांव उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, गटविकास अधिकारी संदीप जठार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उमेशचंद्र देशमुख व अन्य शासकीय अधिकारी यांचाही सहभाग होता...

   कंपनीमधील कोरियन अधिकारी व व्यवस्थापन विभागाने त्यांचे यथोचित स्वागत करून कंपनीबद्दल माहिती दिली व कंपनीने मागील काही वर्षात केलेल्या सामाजिक उपक्रमांबद्द्दल ही आढावा घेतला... कंपनीच्या व्यावसायिक व सामाजिक विकास हेतूंबद्दल माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत पुढील काळात सुयोग्य शासकीय सहकार्याची आशा बोलून दाखवली...

Post a Comment

Previous Post Next Post