महाराष्ट्र वेदभुमी

तंबाखू सेवनामुळे शरीरास होणारे गंभीर आजारासंबधी रुग्णांकरीता जनजागृती व्याख्यान



प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा

     राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दि.३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो...

या अनुषंगाने दि. २४ मे रोजी तंबाखू सेवनामुळे शरीरास होणारे गंभीर दुर्दर आजारासंबधी रुग्णांकरीता प्रबोधन व्याख्यान उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे आयोजित करण्यात आले.. जिल्हा रुग्णालय अलिबाग तर्फे उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे जिल्हा शल्यचिकित्सक ड़ॉ.अम्बादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..


आपल्या अध्यक्षीय भाषणात वैद्यकीय अधीक्षक ड़ॉ.अभय ससाणे म्हणाले की तंबाखूचे सेवन ही अशी एक घातक सवय आहे. ज्यामुळे मनुष्याच्या आरोग्यास बाधा निर्माण होत असते. तंबाखूच्या सेवनाचे आजपर्यंत कितीतरी लोकांना स्वत:चे प्राण गमवावे लागलेले आहेत...सुरवातीला मज्जा म्हणून जडलेली सवय ही कालांतराने अत्यंत घातक परिणाम घडवून आणत असल्याने मनुष्याचे त्यापासून अगोदरच सावध असणे गरजेचे आहे...

  तंबाखूमुळे विविध विकार जडण्याची प्रक्रिया ही खूप मंदगतीने सुरु होत असल्याने बहुतेकदा ती सवय टाकण्याचा प्रयत्न रुग्ण करत नाही...तंबाखूच्या सेवनाने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते...छातीत दुखणे , हृदयविकाराचा होण्यास कारणीभूत होते ,मेंदूचे विकार पोटाचे विकार असे अनेक विकार देखील जडू शकतात...तंबाखूच्या सेवनाने तोंडाचा , घशाचा , फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो...त्यामुळे तंबाखू हा शरीरासाठी घातक आहे...प्रसंगी श्री.सुशील साईकर यांनी तंबाखू सेवन न करण्याची शपथ दिली...  

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक ड़ॉ.अभय ससाणे होते . सामाजिक कार्यकर्ते सुशिल साईकर , सुराज्य सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांची विषेश उपस्थिती होती. दंतरोगतज्ञ डॉ. मनीषा ससाणे यानी व्याख्यान दिले... कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन डॉ. विश्वनाथ देशमुख तर आभार प्रदर्शन सिस्टर इंचार्ज उर्वी वाणी यांनी केले . कार्यक्रमास दुर्गम ग्रामीण भागातील नागरिक व आदिवासी रुग्ण मोठ्या संखेने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post