महाराष्ट्र वेदभुमी

माणगाव पोलीसांची अतुलनीय कामगिरी..प्रवासी प्रमोद मोहितेंची हरवलेली किमती वस्तूची बॅग सुपूर्त

 


माणगाव :- (नरेश पाटील) 

नाईट राउंड करिता  असलेले पो.शि. (825) बोरकर व पो.शि. (1344) पवार असे नाईट गस्त करीत असताना माणगाव एसटी स्टँडसमोर बेवारस बॅग असल्याचे आढळून आले..सापडलेली बॅग तत्काळ ताब्यात घेऊन माणगाव पोलीस ठाणे येथे येऊन सदर बॅग चेक केले असता बॅगमध्ये मंगळसूत्र,  पाच तोळे (की. तीन लाख तीस हजार रुपये), चेन अर्धा तोळा (कि. चाळीस हजार रुपये) व रोख रक्कम 5,000/ रु.असे एकूण 3,75000 /रु.चा मुद्देमाल मिळून आला... 

  सदर बॅगबाबत संबंधित इसमाचा शोध घेऊन प्रमोद चरण मोहिते रा सरवर, म्हसळा हे त्यांच्या मुळ गावी नातेवाईक मयत झाल्याने मुंबई माणगाव असा प्रवास करीत असताना गडबडीत उतरून तसेच बॅग विसरून दुसऱ्या खाजगी गाडीने निघून गेले होते... अशी माहिती मिळून आली..

  वरील सर्व मुद्देमाल त्यांच्या ताब्यात सुस्थितीत देण्यात आला ...दरम्यान यापूर्वीही नेहमीच माणगाव पोलीसांकडून अशा अनेक तत्पर कामगिरीत सतत अग्रसरी पाहायला मिळल्या आहेत....यावरून माणगाव पोलिसांची सतर्कता दिसून येते...

Post a Comment

Previous Post Next Post