महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड परिसरात वारंवार विजपुरवठा खंडित, जनता पूर्णपणे हैराण


पुगांव रोहा ( नंदकुमार कळमकर )

        गेली दोन दिवसापासून कोलाड परिसरातील विज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे येथील जनता पूर्णपणे हैराण झाली असुन याविषयी कोलाड विजवितरण कंपनीचा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे...

         अगोदरच वारंवार वाढत चाललेल्या गर्मीमुळे जनता पूर्णपणे हैराण झाली असुन यात भरीत भर कोलाड परिसरात वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्यामुळे गर्मीने  अंगाची लाही लाही होत आहे तर गर्मीने हैराण झालेली जनतेला रात्री लाईट गेल्यामुळे घरातून बाहेर पडून लाईटची वाट पाहत तासंतास ताटकळत बसून रहावे लागत आहे.तर सर्वांची झोप मोड ही होतांना दिसत आहे...

            याविषयी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन करून चौकशी केली असता त्यांचा फोन ही नॉट रिचिबल असाच येत असल्यामुळे चौकशी तरी कोणाकडे करायची अशा प्रश्न साऱ्या जनतेला पडला आहे.नाही वारा, नाही पाऊस, विज ही चमकत नाही अशा वेळी वारंवार दोन दोन तास लाईट बंद करण्यात येते.परंतु धन धनिकांच्या कंपनीतील लाईट बंद केली जात नाही.तर वारंवार लाईट बंद करून ही लाईट बिल कमी होत नाही. दिवसेंदिवस लाईट बिलाची रक्कम वाढत जात आहे...

                 वारंवार लाईट बंद करण्यात येत असल्यामुळे याचा परिणाम विद्युत उपकरणांवार होत असुन टीव्ही, फ्रीज इतर विद्युत उपकरणे बंद पडत असुन याला जबाबदार कोण असा प्रश्न विज ग्राहकांकडून केला जात आहे..

Post a Comment

Previous Post Next Post