रायगड :- (नरेश पाटील)
गुरूवारी दी.२३ मे रोजी डोंबिवली MIDC स्फोटामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावची शांत आणि प्रेमळ कन्या कु.रोहिणी चंद्रकांत कदम हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोहिणी ही फक्त 25 वर्षाची होती एन तारुण्यात सगळ्यातून निघून जाण ही अत्यंत दुःखद बाब आहे. तिच्या जाण्याने कुटुंबात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ह्या घटनेने कदम कुटुंबावर दुःखाच डोंगर कोसळला आहे .कदम कुटुंबाच्या दुःखात समस्त कोलमांडले ग्रामस्थ सहभागी असून ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळावे तसेच शांत्वन पर अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली रोहिणी ला वाहण्यात आली. दरम्यानचा काळात डोंबिवली MIDC बॉयलर स्पोट दुर्घटनेत अत्ता पर्यंत आठ जणांचे बळी गेले आहे,६० हून अधिक नागरिक तीव्र स्वरूपात जखमी झाले आहे. यातील एकाची स्थिती अत्यांत नाजूक आहे तसेच सदर कारखाने परिसरातील नागरी वस्ती मधिल ही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे असे औद्योगिक आयुक्त कडून महिती समोर आली आहे...