महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन.
मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मनसे तीव्र आंदोलन करणार...
शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात वेळेत हजर रहावे, असे शासनाचे आदेश आहेत... मात्र, या आदेशाला माणगाव जिल्ह्यातील बहुतांशी शासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे...
असाच प्रकार माणगाव तालुक्यात घडला आहे...अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात राहत नसल्यामुळे नागरिकांना त्यांच्या एका कामासाठी अनेक चकरा माराव्या लागतात... अधिकारी आणि कर्मचारी मीटिंग आणि दौऱ्यांची कारणे दाखवून अनेकदा त्यांची खासगी कामे आटोपतात...याच संदर्भात माणगावचे मनसे पक्ष तालुका अध्यक्ष चिमण सुगदरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि. २२मे रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले...या निवेदनात त्यांनी अनेक मुद्दे नमूद केले आहे...
अनेक वर्षापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची शासकीय कामकाजाच्या वेळेमध्ये बदल करण्याची मागणी होती...त्याला अनुसरून आघाडी सरकारचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करून सर्व शनिवार व रविवार सुट्टिचे दिवस असतील अशा आशयाचा शासन निर्णय घेण्यात येवून त्याची अंमलबजावणी २९ फेब्रुवारी २०२० रोजी पासून करण्यात आलेली आहे...त्यानुसार सर्व शासकिय कार्यालयातील शिपायांसाठी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० ही वेळ आणि कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ ही वेळ निश्चित करण्यात आलेली आहे...आणि सर्व शासकिय कार्यालयामध्ये दुपारी १.०० ते २.०० या वेळेमध्ये जास्तीत जास्त अर्ध्या तासाची जेवणाची सुट्टी असेल असे नमूद करण्यात आलेले आहे...
परंतु आपल्या अधिपत्याखाली येत असलेल्या संपूर्ण कार्यालयामध्ये वर नमूद शासन निर्णयाप्रमाणे वेळेचे पालन करण्याबाबत शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण शासकीय वेळेचे पालन केले जात नाही...संबंधित शासकीय कर्मचारी व अधिकारी कार्यालयामध्ये त्यांचा मनमानी कारभार चालवून त्यांच्या वेळेनुसार कार्यालयात येतात व त्यांच्या सोईनुसार सामान्य जनतेची काम करावयाची की नाही हे ठरवून त्यांच्या वाटेल त्या वेळेस ते कार्यालयातून घरी अथवा अन्यत्र निघुन जातात...त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील जनतेला शासकिय कामाकरीता अनेक हेलपाटे मारावे लागतात...परंतु कर्मचारी व अधिकारी यांची कामाची वेळ व कार्यालयात उपस्थित राहण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे त्याचा सामान्य जनतेला खुप त्रास सहन करावा लागत आहे...
शासकिय अधिकारी व कर्मचारी तसेच तलाठी व शिपाई, ग्रामविकास अधिकारी व इतर कर्मचारी यांना ताकीद देण्यात येवून शासन निर्णयानुसार कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाजाकरीता उपस्थित राहण्याबाबत योग्य ते आदेश देण्यात यावेत... असे निवेदन करण्यात आले आहे...याची दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत संबंधित कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल...
सदर त्याप्रसंगी होणाऱ्या संपूर्ण नुकसानीची जबाबदारी संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची असेल असा इशारा देण्यात आला...अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे...
यावेळी चिमण सुगदरे यांच्यासमवेत मनसे कार्यकर्ते अमोल पवार, नितेश पुरारकर, रॉबिन सिंग राजपूत, महेंद्र सुगदरे, अंगद सावंत, पवन पवार, हरी तातवडे आणि साहील पवार उपस्थित होते...
.jpg)

