महाराष्ट्र वेदभुमी

पडला काळाचा घाला मनाला चटका लावणारी दुःखद घटना



विशेष प्रतिनिधी -: श्रीवर्धन 

  दिनांक २३/५/२०२४ रोजी झालेल्या डोंबिवली MIDC स्फोटामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावची शांत आणि प्रेमळ कन्या कु.रोहिणी चंद्रकांत कदम हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे...रोहिणी कदम  ही फक्त २५ वर्षाची होती.. ऐन तारुण्यात एकाएकी सगळ्यातून निघून जाणे ही अत्यंत दुःखद बाब आहे...तिच्या या अकस्मात जाण्याने कुटुंबात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे...ही हेळावून टाकणारी घटना अत्यंत दुर्दैवी आहे ...

   या घटनेने संपूर्ण कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे...कदम कुटुंबाच्या या दुःखात समस्त कोलमांडले ग्रामस्थ सहभागी असून  ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो..

भावपूर्ण श्रद्धांजली रोहिणी

Post a Comment

Previous Post Next Post