रोहा : प्रतिनिधी दी. 30 एप्रिल. प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ सप्ताहास उत्साहात सुरुवात
रोहा शहरातील अष्टमी येथिल श्री स्वामी समर्थ महाराजांचा सप्ताहास मोठया उत्साहात सुरूवात झाली आहे. यामुळे अष्टमीत सेवेकऱ्यांची मोठी वर्दळ दिसुन आली, सप्ताह दरम्यान अखंड नाम, जप, यज्ञ, याग आदी धार्मिक विधी व कार्यक्रम अष्टमी केंद्रात संपन्न होत आहेत...
अष्टमी येथिल दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास आणि बाल सुसंस्कार केंद्रात या धार्मिक उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे... श्री स्वामी समर्थ सप्ताह म्हणजे रोहा अष्टमीकरांचा एक कौटुंबिक धार्मिक सोहळा म्हणुन सर्वपरिचित आहे.. परिणामी अष्टमीत सप्ताह काळात सेवेकऱ्यांची मोठी वर्दळ असते... शेकडो सेवेकरी आपली सेवा रुजू करण्यासाठी येथे येतात... सप्ताहा दरम्यान अखंड विणावादन, चरीत्र सारामॄत वाचन, श्री गुरूचरीत्र पठण, श्री दुर्गासप्तशी पोथी पारायण, दिवसा महिलांची तर रात्री पुरूषांची प्रहरे, अग्नी प्रदिपन, नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग, मनोबोध याग, श्री चंडीयाग, श्री स्वामी याग, श्री गीताई याग, श्री रूद्रयाग याग, मल्हारी याग, बली प्रदान, पुर्णाहुती, सत्य दत्त पुजन, महाप्रसाद, औदुंबर प्रदक्षिणा आदी विविध धार्मिक विधीं बरोबर मनाचे श्लोक वाचन, पसायदान, अभंग आणि सहस्त्रनाम वाचन केले जात आहे... यासाठी श्री स्वामी सेवेकरी परिश्रम घेत असून या स्वामी सप्ताहाची सांगता सोमवारी ६ मे रोजी होणार आहे..