कोलाड (श्याम लोखंडे )
ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अपघातांची मालिका सुरू,लोकनेत्यांच्या निवडणुकीवर परिणाम होईल का?
गेली बारा वर्ष मुंबई-गोवा महामार्गाची रडकथा सूरू आहे याला जबाबदार कोण? ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अपघतांच्या संख्येत वाढ होत असताना दिसत आहे.दररोज होत असलेल्या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे... त्यामुळे राजरोसपणे चाललेल्या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुले होत असलेल्या अपघाताना जबाबदार कोण असा प्रश्र्न पडला आहे...
तसेच या भोंगळ कारभारामुळे काही ठिकाणी मार्गावरील वाहतूक कोंडीला देखिल सामना करावे लागत आहे. अर्धवटी केलेली कामे प्रवासी नागरीक तथा वाहन चालकास डोके दुःखी ठरत आहेत.कामे देखील निकृष्ट दर्जाची होत असल्याचे बोलले जात आहे.काम सुरू आहे मात्र त्याचा पसारा साऱ्या रोड भर मार्गावर पसरलेला असल्याने अनेक वाहनांना तसेच चालकांना त्याचा अंदाज न आल्याने अपघातांना सामोरे जावे लागते.देशात विविध ठिकाणी अनेक महामार्ग केंद्र सरकारने तयार केले मात्र कोकणात जाणारा एकमेव मार्ग मुंबई गोवा महामार्ग का रखडले गेले याचे आत्मपरीक्षण कोकण वासियानी केले पाहिजे. बारमाही कोकणातील सण उत्सव त्यामुळे नेहमीचीच रहदारी त्यात महामार्गाच्या भोंगळ कारभारामुळे प्रवाशी वर्गाचे तीन तेरा वाजत मागील बारा वर्षात या मार्गावरून सुखकर तसेच वेळेवर प्रवास प्रवाशी वर्गाचे होत नसल्याचे आजही पेण ते माणगाव या दरम्यान दिसून येत आहे...
मुंबई गोवा महामार्गावरील नगोठणे कोलाड मार्गावरील खांब हद्दीत सुकेळी खिंड उतारावर मेन वळणावर काँक्रीटीकरण कामासाठी वापरात येणारी खडी क्रश रेतीचे भले मोठे ढिगारे च्या ढिगारे मेन मार्गावर आले आल्याने दुचाकीस्वार दिवसा तसेच रात्रीच्या सुमारास अंदाज तसेच हे ढिगारे नजरेस न आल्याने घसरून अपघात घडत आहेत तसेच खांब कोलाड दरम्यान मार्ग साईड पट्टी साठी टाकण्यात येत असलेला माती भराव यामुळे देखील अपघात घडत असल्याने मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारला काहीच घेणे ना देणे त्याची मनमानी सुरूच त्यामुळे अर्धवट कामांमुळे अपघाताला सामोरे जावे लागते हे आजही दुर्दैव म्हणावं लागेल तर यावर उपाय योजना कोण करणार असा सवाल प्रवाशी वर्गातून व्यक्त केला जात आहे...
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करण्यात अनेकांची घरे, शेत जमीन, तसेच व्यवसायिकांची दुकाने गेली काहींचा रोजगार गेला शासनाने त्या अल्प भूधारकांना पुरेसा मोबदला देखिल दिला नाही अनेकदा भूधारक याचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी न्यायक्कासाठी अनेकदा महामार्गावर उपोषणास बसले तरी देखील या माय बाप सरकारला त्याची जाग आली नाही मार्गाच्या कामात तसेच ठेकेारांच्या दिरंगाईने कित्येक ठेकेदार आले गेले अनेकदा रायगडाचे पत्रकार यांनी यासाठीच आंदोलने केले पडलेल्या मोठ मोठ्या खड्यात अनेकांचे जीव गेले काहीना अपंगत्वामुळे त्यांची घरे रस्त्यावर आली..मात्र मुंबई गोवा महामार्गाचे काम काही पूर्ण होत नसल्याने या दिरंगाईला जबाबदार को असा प्रश्न उपस्थित होत आहे...
रखडलेल्या कामात खांब, पुई महिसदरा नदीपात्रावरील पुल,कोलाड आंबेवाडी नका इंदापूर बायपास माणगाव बाय पास मार्ग येथील कामे सदा नी गदा आजतागायत रखडलेली आहेत..त्यामुळे देशात राज्यात निवडणुका येतात जातात निवडून येतात ते सत्तेत बसल्यावर दिलेले आशवासन सारे विसरून जातात त्यामुळे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामांचा आता कोकणातील लोकसभेच्या निवडणुकीवर या रडकथेवर मतदारांचा कौल नक्की कोणाला असेल याकडे लक्ष लागले आहे...तसेच रखडलेल्या या कामांचा येथील मतदार राजे नक्की समाचार घेतील काय हेच पाहावे लागणार आहे...