महाराष्ट्र वेदभुमी

श्री ताडदेवी उत्सव सोहळा १ मे २०२४



अलिबाग : शरद पाटील

श्री ताडदेवी उत्सव सोहळा चैत्र कृ ८ बुधवार दिनांक १ मे २०२४ रोजी संपन्न होत आहे..

सकाळी ९ ते १० वा च्या दरम्यान अभिषेक,पूजन,व आरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे..

सकाळी ११ ते १२:३० वा जय खंडोबा भजन मंडळ चोरढे कु जयश्री माणिक पंची..

१२:३० ते २:०० या दरम्यान  सद्गुरू काडसिद्धेश्र्वर महाराज भजन मंडळ चोरढे बुवा श्री हरिश्चंद्र गोविंद घाग.. 

२:०० ते ३:३० च्या.दरम्यान श्री श्याम म्हात्रे  श्री भजन मंडळ सेवा सातिर्डे.. 

तसेच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज भजन मंडळ वळके ३:३०.ते ५: ०० यांची भजनरुपी सेवा  आयोजित करण्यात आली आहे....

भाविकांची  महाप्रसादची व्यवस्था महिला मंडळ तारडे यांच्या कडून करण्यात आली आहे...

रात्री १०: ०० वा प्रेक्षकांची मनोरंजनाची सोय विशेष म्हणजे झगडेवाडी प्रस्तुत "गाव तसं चांगलं" निकेत खेरटकर हास्यसम्राट. लेखक, दिग्दर्शक नितेश भगत यांचे एक धमाल विनोदी नाटक आयोजित करण्यात आले आहे...तसेच  "ढोलकीच्या तालावर" अल्बम फेम चैताली गुरव महाराष्ट्राची सुपर स्टार फेम हीची नृत्यकला आयोजित करण्यात आली आहे....

 या संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन नवतरुण मंडळ ,महीला मंडळ व ग्रामस्थ मंडळ ताडवाडी यांच्या तर्फे करण्यात आले असून परिसरातील सर्व भाविक व प्रेक्षक यांनी या कार्यक्रमाला उपस्थीत राहून कार्यकमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण करण्यात आले आहे..

Post a Comment

Previous Post Next Post